पुणे दि 31 : – तेली समाज पुत्र डाॅ.आर टी बोरसे सर ससून रुग्णालय पुणे येथे कार्यरत असलेले यांनी नायडू हाॅस्पीटल पुणे येथील कोरोना पाॅझीटीव्ह रुग्णाँवर उपचार केलेत व ते त्या उपचारात यशस्वी झाले. त्या रुग्नांचा रीपोर्ट काही दिवसात निगेटीव्ह आला व त्या पेशंटना डिसचार्ज देण्यात आला. या कामी त्यांना तेली समाज कन्या सिस्टर छाया राऊत- जगताप यांचे सहकार्य लाभले.दोन्हीही वैद्यक क्षेत्रातील कर्मचारी अतिशय उत्तम कर्तव्य बजावत आहेत.तसेच देशातील अनेक डॉक्टर्स आपले कर्तव्य बजावत आहेत.मा.पंतप्रधान नरेंद्र जी मोदी साहेबांनी डाॅ. आर टी बोरसे सरांशी आणि सिस्टर छाया यांचेशी मोबाईल द्वारे संपर्क साधून उत्कृष्ट काम केल्याबद्दल शाबासकी देउन अभिनंदन केले आहे.ही आपल्या तेली समाजा साठीच नव्हे तर आपल्या भारत देशाची अभिमानाची बाब आहे.
दौड प्रतिनिधी :- प्रा.महेश पांडुरंग देशमाने