पुणे दि २४ :- पुणे परिसरात हिंजवडीतील आयटी हबमध्ये 6 लाख 40 हजार रुपयांचा 25 किलो गांजा अमली पदार्थ विरोधी पथकाकडून जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थ पथकाने सापळा रचून योगेश्वर गजानन फाटे या तरुणाला अटक केली असून तो जनता वसाहत गोखलेनगर पुणे येथे राहतो. तो २३ वर्षाचा आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राजीव गांधी आयटी पार्क हिंजवडी फेज 2 येथे एक तरुण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. त्याच्याजवळ असलेल्या बॅगेत 25 किलो गांजा सापडला असून त्याची एकूण किंमत 6 लाख 40 हजार रुपये किंमत आहे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी शाकिर जेनेडी आणि संदीप पाटील यांच्या पथकाकडून ही कामगिरी करण्यात आली आहे.