पुणे ग्रामीण दि२६ :- पुणे ग्रामीण LCB पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून एक जणांना अटक केली आहे. त्याच्याकडून ४७ हजार ६१५ मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अनिल माने याला अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत झारगडवाडी येथे काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार LCB पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले त्याच्या कडून एकूण ४६,हजार ९१० रुपये रोख रक्कमेसह एकूण ४७ हजार ६१५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पुढील कारवाईसाठी सदर आरोपीस मुद्देमालासह बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई पद्माकर घनवट पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली अनिल काळे, रविराज कोकरे, ज्ञानेश्वर क्षिरसागर
यांनी केली आहे