पुणे दि २६ :- पुणे शहरातील एका पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज समोर आली आहे.नाना हंडाळ (वय 40) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना हंडाळ पुणे शहर पोलीस दलात पोलीस नाईक आहेत. दरम्यान ते बंडगार्डन पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते.पुणे शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये डी इमारतीत राहत होते. त्यांना एक मुलगी आहे.दरम्यान, आज सायंकाळी त्यांचे कुटूंब बाहेर गेल्यानंतर 4 ते 7 वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.हा प्रकार समोर येताच शिवाजीनगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या आत्महत्ये मागचे कारण समजू शकलेले नाही. पण त्यांच्या आत्महत्येने पोलीस दलात शोककळा पसरली आहे.