पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींना लाभ, अनुदान आणि सेवा पुरविण्यासाठी पीएमसी डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) आणि सेवा हे संकेतस्थळ विकसित केले आहे. पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांच्या योजना संकेतस्थळाशी संलग्न करण्यास सुरुवात झाली असून योजनेच्या लाभार्थ्यांना आधार पेमेंट ब्रिजद्वारे लाभ, अनुदान आणि सेवा थेट प्राप्त होतील.
सध्या अस्तित्वात असलेल्या लाभ हस्तांतरण प्रक्रियेत अर्ज जमा करण्यापासून ते लाभप्राप्तीपर्यंत विविध ठिकाणी मानवी हस्तक्षेपाची शक्यता आहे. याशिवाय, लाभार्थ्यांची माहिती पारंपरिक पद्धतीने हाताळली जात असताना लाभार्थ्यांच्या माहितीची पुनरावृत्ती व दुरुपयोग होण्याची शक्यता उद्भवते. या संकेतस्थळामार्फत थेट लाभ हस्तांतरणात समावेश असणाऱ्या प्रक्रिया आणि कार्य, योजनांमधील व्यवस्थापन कार्याचे स्वयंचलन (ऑटोमेशन) केले जाईल.
पुणे महानगरपालिकेने आपल्या आरोग्य, शिक्षण, कामगार कल्याण, सामाजिक विकास व वित्त विभाग या 5 विभागांमधील 105 योजनांची थेट लाभ हस्तांतरणासाठी निवड केली आहे. या योजनांचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे- लाभाधारित योजना (53) आणि रोख स्वरुपात लाभ देणाऱ्या योजना (52).
अधिक माहिती मिळविण्यासाठी पीएमसी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) आणि सर्व्हिसेस पोर्टलला भेट द्या, त्यासाठी क्लिक करा: http://dbt.punecorporation.org