पुणे दि 01 – करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात संचारबंदी लागू केली असूनही काही लोक विनाकारण बाहेर आढळत आहेत. तसेच देशभरात ‘लॉकडाऊन’ केले आहे. त्यामुळे अशांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पुणे शहरात पोलिसांनी दोन दिवसात 270 वाहने जप्त केली आहेत, लॉकडाऊन संचारबंदी काळात अनावश्यकपणे रोडवर वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी संपुर्ण देशात करण्यात आलेले लॉकडाऊन तसेच पुणे शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे पोलीस सह आयुक्त , पुणे शहर यांनी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता सन १९७३ चे कलम १४४ ( १ ) ( ३ ) प्रमाणे वाहन वापरास व वाहतुकीस मनाई आदेश पारीत केले आहेत . सदर कालावधीत अत्यावश्यक सेवेतील वाहने व अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी तसेच वैद्यकीय तातडीचे कामाकरीता पोलीसांकडून देण्यात येणा – या पासेसची वाहने यांना शहरात ये – जा करण्यास सवलत देण्यात आली आहे . शहरात लॉकडाऊन अमलात आले पासून पुणे शहर पोलीस दलाकडून नागरीकांनी लॉकडाऊन तसेच संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करु नये याकरीता वाहतुक शाखेचे अपर पोलीस आयुक्त , डॉ . संजय शिंदे यांचे निरीक्षणाखाली शहरात १३ ठिकाणी नाकाबंदीचे पॉईंट लाऊन वाहने चेक केली जात आहे व दि ३० ते ३१/०३/२०२० या दोन दिवसात शहरामध्ये काही नागरीक हे अनावश्यकपणे रस्त्यावर वाहने चालवित असताना मिळून आले आहेत त्यांच्यावर वाहतुक शाखा व पोलीस ठाणेकडून केलेली कारवाई दिनांक 30 रोजी भा . द . वि . कलम १८८ अन्वये वाहतुक शाखेकडून 79 केलेली पोलीस स्टेशनकडून 286 केलेली वाहन जप्त 164 व दिनांक 31 रोजी भा . द . वि . कलम १८८ अन्वये वाहतुक शाखेकडून 79 केलेली पोलीस स्टेशनकडून 131 केलेली वाहन जप्त 106 कारवाई कारवाई केली आहे तरी नागरीकांना आवाहन करण्यात येते की , पुणे शहरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्याकडून प्रशासनांकडून सर्व नागरीकांना वेळोवेळी सुचना देण्यात येत आहे . प्रादुर्भाव रोखन्यासाठी नागरीकांनी आपले घरात थांबणे आवश्यक आहे व कायद्याचे पालन अनिवार्यचे आहे .