पुणे ग्रामीण दि ०२ :; ” जिवनावश्यक वस्तुची वाहतुक करणाऱ्या ट्रक चालकाचे खुनासह दरोडयाचा गुन्हा गुन्ह्यातील आरोपीस ४८ तासात आत अटक पुणे ग्रामीणएल.सी.बी.शाखेची कामगिरी ” पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा ( एल . सी . बी . ) पथकाने दोघांना जेरबंद करून जिवनावश्यक वस्तुची वाहतुक करणाऱ्या ट्रक चालकाचे खुनासह दरोडयाचा गुन्हा ४८ तासात उघडकीस आणला असून इतर दरोडयाचा १ जबरी चोरीचे २ व चोरीचे २ असे एकूण ६ गुन्हे उघडकीस आणलेले आहेत . दि ३० रोजी रात्री ०१ :२० वा . चे सुमारास मौजे मळद ता . दौंड जि . पुणे गावचे हद्दीत रेल्वे उहाणपुलाजवळ सोलापुर – पुणे हायवे रोडलगत लातूर ते पुणे मार्केटयार्ड अशी डाळ वाहतुक करणारा टूक नं एमएच,२५ यु ४२०१ वरील चालक काशिनाथ रामभाऊ कदम वय ५५ वर्षे रा . ढोकी ता . कळंब जि . उस्मानाबाद हे ट्रक रोडचे कडेला लावून लघुशंखेसाठी जावून परत येत असताना सब रोडने पायी येणारे पाच ते सहा अनोळखी इसमांनी त्याचे छातीवर चाकूने वार करुन त्याचे जवळील रोख रक्कम तीन हजार रुपये व मोबाईल तसेच त्याचे अगोदर त्याच ठिकाणी थांबलेला टेम्पो नं एमएच – १२ एचडी १३११ ची केबीनची काच फोडून टेम्पो क्लीनर महंमद मेहबुब पठाण वय ४९ वर्षे रा . उस्मानाबाद याचे खिशातील मोबाईल व त्याच टेम्पोचा ड्रायव्हर अल्ताफ खैयुम पटेल याचे खिशातील रोख २ हजार रुपये पाकीट असा एकुण ७ हजार चा माल जबरीने चोरुन नेला होता.व घटनेत ट्रक चालक काशिनाथ रामभाऊ कदम वय ५५ वर्षे रा . ढोकी , ता . कळंब , जि . उस्मानाबाद यांना छातीवर चाकूचे वार झालेने औषधोपचारास घेवुन जात असताना रस्त्यात मयत झाले होते व टेम्पो क्लीनर महंमद मेहबुब पठाण यास जबर जखमी झालेने दौड रुग्णालय येथे अॅडमीट केले होते या घटनेबाबत ट्रकचा क्लीनर शकील आयुब शेख वय ३५ रा . कसबे तडवळा ता . जि . उस्मानाबाद यांनी दिलेल्या तक्रारी वरून दौड पोलीस स्टेशनला खुनासह दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता . गुन्हा करताना आरोपींनी अतिशय चतुराईने गुन्हा केलेला होता त्यातच कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता मोठया प्रमाणावर बंदोबस्त लावलेला असल्यामुळे बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळत गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलीसांसमोर होते तसेच जिवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारे लोकांची लुटमार होत असल्यामुळे आरोपी पकडणे गरजेचे झालेले होते . सदर गंभीर गुन्हा उघडकीस आणणेकामी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप पाटील , बारामती अपर पोलीस अधीक्षक जयंत मिना , दौड एस . डी . पी . ओ . श्रीमती ऐश्वर्या शर्मा यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून दौंड पोलीस स्टेशन , बारामती विभागाची व स्थानिक गुन्हे शाखेची वेगवेगळी पथके नेमून त्यांना गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिलेल्या होत्या . वरीष्ठांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकाने समांतर तपासात गुन्हयाची माहिती घेवून पुणे , अहमदनगर , सोलापूर येथे जावून वेशांतर करून गोपनीय खबन्यामार्फत माहिती काढली असता पूर्वीचे रेकॉर्डवरील असलेले आरोपी गुन्हयात निष्पन्न केले . त्यानंतर दौड पो . स्टे . चे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांचेमार्फत त्यांचेकडील डी . बी . पथकाची मदत घेवून आरोपी समाजाच्या वस्त्या चेक करताना आरोपी पळू नये म्हणून अॅम्बुलन्सचा वापर करून मेडीकल स्टाफचा वेश परिधान करून वाडया , वस्त्या चेक करीत असताना आरोपी गोपाळवाडी – पाटस रोड , दौंड येथे येणार असल्याची माहिती मिळाली व तात्काळ त्या ठिकाणी जावून आरोपी पोलीसांची चाहूल लागलेने पळून जाताना सुमारे २ कि . मी . चित्तथरारक पाठलाग करून आरोपी १ ) गणेश अजिनाथ चव्हाण वय २२ वर्षे रा . बोरावकेनगर , दौड ता . दौंड जि . पुणे २ ) समीर उर्फ सुरज किरण भोसले वय १९ वर्षे रा . गोपाळवाडी – पाटस रोड , दौंड ता . दौंड जि . पुणे या दोघांना ताब्यात घेतलेले आहे . आरोपींकडे केलेल्या तपासात त्यांनी त्यांचे इतर साथीदार यांचेसह दोन दिवसापूर्वी सोलापूर रोडला मळद येथे पुलाजवळ थांबलेल्या ट्रकचालकास चाकूने भोकसून त्याचेकडील पैसे व मोबाईल लुटुन त्याचे पाठीमागे थांबलेल्या टेम्पोची काच फोडून त्यांचेकडील मोबाईल पैसे लुटल्याचे निष्पन्न झाले आहे . तसेच त्याचे आदल्या दिवशी खडकी येथे एका कार्यालयासमोर थांबलेल्या छोटा हत्ती टेम्पोमधील एकाचे डोक्यावर चाकूने मारुन पैसे , मोबाईल , बॅगा व महिलांचे दागिने लूटल्याचे सांगून ८ दिवसापूर्वी वरवंड येथील एका हॉटेलसमोरुन मोटरसायकलची चोरी करुन हॉटलमागे असलेल्या एमएसईबी पॉवरहाऊस येथील वॉचमनला गजाने डोक्यात मारहाण करुन मोबाईल व पैसे लुटल्याचे सांगितले . १० दिवसापूर्वी लिंगाळी येथून एक पॅशन प्रो मोटरसायकल चोरल्याचे सांगितले . तसेच सुमारे १५ दिवसापूर्वी स्वामीचिंचोली येथे एका हॉटेलसमोर लघवीसाठी थांबलेल्या
दोघांपैकी एकास कु – हाडीने मारहाण करून चाकूचा धाक दाखवून त्यांचेकडील मोबाईल व पैसे लुटल्याचे सांगितले आहे . सदरबाबत दौंड व यवत पोलीस स्टेशनला खुनासह दरोडयाचा १ तसेच दरोडयाचा १ , जबरी चोरीचे २ व चोरीचे २ असे एकूण ६ गुन्हे दाखल आहेत . तसेच आरोपी गणेश चव्हाण हा सध्या शिक्रापूर व दौंड पोलीस स्टेशनचे जबरी गुन्हयात फरार होता . सदर आव्हानात्मक गुन्हयाचा कौशल्यपूर्ण तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली सहा . पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड , पोहवा . अनिल काळे , रवि कोकरे , महेश गायकवाड , निलेश कदम , सचिन गायकवाड , पोलीस नाईक सुभाष राऊत , गुरु गायकवाड , ज्ञानदेव क्षिरसागर , काशिनाथ राजापुरे , दौंड पोलीस स्टेशनचे असिफ शेख , सुरज गुंजाळ व श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोहवा . अंकुश ढवळे यांनी करून गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे . त्याबद्दल पोलीस अधीक्षक यांनी तपास पथकास बक्षिस जाहिर केले आहे . सदर दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी दौंड पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे . आरोपींनी आणखीन गुन्हे केल्याची शक्यता असून त्याबाबत पुढील अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक हे करीत आहेत .