पुणे दि १५ :-पुणे औध क्षेत्रीय कार्यालयातील कार्यालयामार्फत आज दि १५ रोजी पुणे विद्यापीठ चौकात थुंकी सम्राट यांच्या वर दंडा नात्मक कारवाई करण्यात आली व थुंकी सम्राट त्यांच्या कडून रास्ता साफ करून घेण्यात आले पुणे विद्यापीठ चौकात सिग्नल जवळ
१८ जणांवर कारवाई करण्यात आली व दंड वसूल करणात आले कारवाई मध्ये व सर्व मुकादम व बिगारी सेवक यांनी थुंकी सम्राट याच्या वर कारवाई करण्यात आली रस्त्यावर थुंकाल,नागरीकांवर कारवाई करण्यात येईल व तुम्हालाच आता ते थुंकलेल पुसावे लागेल आणि शंभर रुपये दंडही भरावा लागेल. सार्वजनिक ठिकाणी पान, गुटखा किंवा तंबाखू खाऊन अस्वच्छता करणाऱ्या महापालिकेने कारवाई करण्यात येणार आहे महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांतर्गत गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर थुकंणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने ही मोहीम राबविली. रस्त्यावर थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, कचऱ्याचे वर्गीकरण करणे आदींबाबत महापालिकेकडून वेळोवेळी जनजागृती केली जाते. मात्र तरीही नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केली जात आहे. यामुळे महापालिकेने जनजागृतीबरोबरच धडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे.पुण महापालिकेचे कर्मचाऱ्यांना एखादी व्यक्ती रस्त्यावर थुंकताना आढळली, तर त्या व्यक्तीला पाण्याची बाटली आणि फडके देऊन रस्ता साफ करण्यास सांगितले जाईल”
पुणे प्रतिनिधी गनेश लगड