पुणे ग्रामीण दि ०६ : – पुणे जिल्ह्यातील कापुरहोळ भोर परिसरात एका सराफी दुकानात पोलीसांच्या गणवेशात येऊन दरोडेखोरांच्या टोळीने घुसून गोळीबार करत २७ लाखाचे सोने लुटून नेल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरोडेखोर पोलिसांचा गणवेश घालून आले होते. यात सुदैवाने गोळी
कोणाला लागली नसल्याचेसांगण्यात आले.याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, भोर तालुक्यातील कापुरहोळ गावाजवळ
बालाजी कॉम्प्लेक्समध्ये बालाजी सराफ पेढी आहे. गुरुवारी दुपारी ४.४५ वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर गाडीतून उतरले. यातील दोन जण पोलिसांच्या गणवेशात होते.त्यांनी तीन जणांना बेड्या घालून सराफी दुकानात आणले. दुकान मालकाला या कथित आरोपींनी चोरीचा माल तुम्हाला विकला आहे, तो माल आमच्याकडे द्या, असे म्हणून पोलीस वेषातील दरोडेखोर सराफाला दमदाटी करू लागले. तुझ्या दुकानातील सर्व दागिने दाखव म्हणून त्यांना दुकानमालकाला दमदाटी केली. दुकानदाराने सर्व सोने दाखवताच चोरट्यांनी दागिने बॅगेत भरण्यास सुरुवात केली. यावेळी एकाने दरोडेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दरोडेखोराने शेजारी कापड दुकानच्या काचेवर एक, मेडिकल दुकानाच्या बोर्डावर एक, काउंटरला एक आणि तीन गोळ्या हवेत, अशा सहा गोळ्या झाडून दरोडेखोर पसार झाले. लूटमारीत सुमारे 26 ते 27 लाखांचे दागिने लुटून नेल्याची माहिती दुकान मालक संजय किसन निकम यांनी दिली आहे. हे दरोडेखोर सारोळा, शिरवळ गावच्या दिशेने पसार होताच याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर राजगड पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली व सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ अपर पोलीस अधीक्षक , बारामती विभाग , पुणे , उप विभागीय पोलीस अधिकारी भोर विभाग , पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच पोलीस निरीक्षक राजगड पोलीस स्टेशन हे घटनास्थळी हजर असून , . संदीप पाटील , पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हयाच्या सिमेवर नाकाबंदी लावण्यात आलेली असून , दरोडेखोरांच्या शोधाकामी वेगवेगळी पोलीस पथके रवाना केली आहेत. दरोडेखोर चारचाकीतून सातारच्या दिशेने पसार झाल्याने सारोळा, सासवड, नीरा आदी ठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पुणे पोलिसांना देखील याची माहिती दिली आहे. पुढील तपास राजगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनायक वेताळ करीत आहेत.व नाकाबंदी करून पोलिसांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.