पुणे दि २२:- पुणे शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,संपूर्ण भारतातील प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, शहरातील आरोग्य आणी कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारमिझल-रूबेला लसीकरण मोहीम पुणे शहरात प्रत्येक शाळेत आगंणवाडीत आणि आरोग्य केंद्रात, अगदी मोफत … शासकीय व मनपा आरोग्य विभागातर्फेमिझल-रूबेला लसीकरण मोहीम २७ नोव्हेंबर २०१८ पासून सुरु होत आहे.
या लसीबद्दल पालकांच्या मनात गैरसमज असतील तर त्यांची समजूत घालून त्यांना बालकांना लस देऊन सुरक्षित करण्यास सांगावे…
ही लस “9 महिने ते 15 वर्ष”पर्यंतच्या बालकांना द्यावयाची आहे म्हणजेच 10 वी पर्यंतच्या प्रत्येक विद्यार्थ्याला ही लस द्यावयाची आहे.
【सुरक्षितता 】 : – M/R लस अत्यंत सुरक्षित आहे,घाबरण्याचे काहीही कारण नाही.
१)आतापर्यंत भारतात ९ कोटी ६० लाख बालकांना ही लस देण्यात आली आहे.
२)आतापर्यंत नऊ राज्यांमध्ये ही M/R ची मोहीम राबविली गेली आहे. यात कोणत्याच बाळाला काहीही झालेले नाही.
३)ही लस दहा डोसेसची असणार आहे.
४)ही मोहीम पाच आठवडे चालणार आहे.
५)तसेच ही लस AD सिरींजद्वारे दिली जाते. ही सिरींज एकदा वापरात आल्यावर आपोआप लाॅक होते,त्यामुळे या सिरींजचा वापर पुन्हा करता येत नाही.
ही लस फक्त “शासकीय व मनपा रूग्णालयातच” उपलब्ध असून बाळ अधिक सुरक्षित कसे राहील,याची योग्य ती संपूर्ण काळजी घेतली जाते.
हा आजार झाल्यास होणारे विपरीत परिणाम.. 【 लक्षण】: –
गर्भवती मातेला रुबेला झाल्यास तिच्या होणाऱ्या बाळास हा आजार होण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे त्या बाळास खालील बाबी होण्याची दाट शक्यता असू शकते.
१) बाळाचा मेंदू छोटा असू शकतो.
२)बाळ जन्मत:च अपंग असू शकते.
३)बाळाचे डोळे तिरपे तसेच डोळ्यात टिक असू शकते.
४)बाळाला M/R लस न दिल्यामुळे संपूर्ण भारतात ५० हजार बालके मृत्यू पावतात.
५)बाळास आंधळेपणासुद्धा येऊ शकतो.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, ही मोहीम फक्त शासनाची किंवा आरोग्य विभागाचीच जबाबदारी न समजता “आपलं शहर,आपलं मूल” ही सामाजिक संकल्पना मनात ठेऊन आपल्या शहरातील प्रत्येक बालकाला हवेतून पसरणार्या या रोगापासून वाचविण्यासाठी ही लस देऊन संरक्षण देता येईल, यासाठी प्रयत्न करु या.. पुणे मनपा आरोग्य विभागाच्या या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी होवूया.
आरोग्य अधिकारी
पुणे, महानगरपालिका.
🙏