पुणे दि ३० :- पुण्यातील बाणेर भागातील नगरसेवक बाबुराव चांदेरे यांच्या हत्येची सुपारी देण्यात आल्याची धमकीची महिती मिळताच बाणेर परीसरात खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे .चतुर्श्रुंगी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , दि २८ डिसेंबर रोजी बाणेर भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक बाबुराव चांदेरे यांचा मुलगा समीर याला फोन आला तुमच्या वडीलांना मारण्यासाठी काही मुले बाणेर येथे आली आहेत असा एक फोन आला होता. माहिती मिळाल्यानंतर चांदेरे यांच्या घराच्या बाहेरील बाजूस एका चारचाकी वाहनात काही जण दबा धरुन बसलेले दिसले . चांदेरे यांच्या पत्नीने त्यांच्याकडे कोण पाहिजे अशी विचारणा केली असता त्यांनी काही न बोलता गाडी निघून गेले . व चतुर्श्रुंगी पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेराद्वारे देखील तपास सुरू असल्याचे चतुर्श्रुंगी पोलिसांनी सांगितले .व पुढील तपास चतुर्श्रुंगी पोलिस करत आहे