पुणे ग्रामीण दि १४ : – पुणे जिल्ह्यामध्ये दि, १५ जानेवारी रोजी ग्रामपंचयात निवडणूका असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये या साठी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी पोलिसांना सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी हद्दीमध्ये पेट्रोलिंग सुरू केले होते.वगुन्हे शाखेचे पथक खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना दोघे जण खेड बसस्टँडवर पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली़ व मोठा शस्त्रसाठा ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे़
खेड बस स्थानकावर दोघांकडून ४ पिस्तुले व ८ काडतुसे असा १ लाख ७४ हजार ८०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
प्रविण ऊर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ (वय २८, रा़ वाळद, ता़ खेड), निलेश ऊर्फ दादा राजेंद्र वांझरे (वय २४, रा़ वांझरवाडी, ता़ दौंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.राज्यात सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरु आहेत़ काल सायंकाळी प्रचार संपला असून उद्या शुक्रवारी मतदान होणार आहे़ त्यामुळे निवडणुका असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी सर्वांना सूचना दिल्या होत्या़ त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पेट्रोलिंग सुरु केले होते गुन्हे शाखेचे पथक खेड विभागात पेट्रोलिंग करत असताना दोघे जण खेड बसस्टँडवर पिस्तुल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली़ त्याबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट व त्यांचे सहकारी खेड बसस्टँडवर पोहचले़ त्यांनी तेथे टीम सह त्या ठिकाणी जाऊन त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवी ची उत्तरे दिली त्यामुळे त्यांचा संशय आल्याने त्यांची अंग झडती घेतली असता दोघांच्या कमरेला प्रत्येकी 2 असे एकूण देशी बनावटीचे 4 पिस्टल व त्यामध्ये प्रत्येकी 2 असे 8 राउंड असा एकूण 1 लाख 74 हजार 800 रुपयाचे मुद्देमाल मिळून आला आहे.त्यांची नावे अनुक्रमे 1) प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ वय 28 रा. वाळद, ता. खेड, जि.पुणे
2) निलेश उर्फ दादा राजेंद्र वांझरे वय 24,रा. वांझरवाडी, ता. दौंड, जि. पुणे सदर आरोपींची वैदकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाई साठी खेड पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे.सदर ची कारवाई मा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोसई अमोल गोरे,पोहवा जनार्दन शेळके,पोना राजू मोमीन,
पोशी अमोल शेडगे,पोशी मंगेश भगत,पोशी बाळासाहेब खडके,
पोशी अक्षय नवले,पोशी अक्षय जावळे,सफो दत्तात्रय जगताप,
सफो शब्बीर पठाण,पोहवा विद्याधर निच्चीत,पोहवा मुकुंद आयाचित,पो ह प्रमोद नवले,पोना सागर चंद्रशेखर,पोशी प्रसन्न घाडगे, यांनी केली आहे.