पुणे दि०७ : – पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुणे जिल्ह्यात यवत शहरात कारवाई करत एका तलाठ्याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे. एसीबीची कारवाई केली आहे व पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.कुंडलिक नामदेव केंद्रे (वय 36) व शंकर दत्तू टुले (वय 33) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.केंद्रे दौंडमधील दहिटने येथे तलाठी आहेत.तर शंकर हा खासगी व्यक्ती आहे.यातील तक्रारदार यांच्या सातबारा भोगवटा वर्ग बदलण्यासाठी अर्ज केला होता.त्यावेळी लोकसेवक कुंडलिक याने 35 हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती.याबाबत त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. त्याची पडताळणी करण्यात आली.त्यानुसार सापळा कारवाईत तडजोडीअंती 30 हजार रुपयांची लाच घेताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे , ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व अपर पोलीस अधीक्षक. सुरज गुरव , ला.प्र.वि. पुणे , सुहास नाडगौडा , अपर पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली . शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास 1068 क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन . राजेश बनसोडे , पोलीस अधीक्षक लाचलचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी केले आहे .