पुणे दि १३:- खंडणी, फसवणूक आणि मोक्कामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या एका दैनिकाचा पत्रकार देवेंद्र जैन याला पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. पत्रकार देवेंद्र जैन हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता.त्याच्याविरूध्द पुणे शहरातील काही पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हयांची नोंद आहे. रवींद्र बर्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलिस शैलेश जगताप, परवेझ जमादार, संजय भोकरे आणि इतरांविरूध्द पुणे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने यापुर्वी रवींद्र बर्हाटेच्या पत्नी आणि मुलाला देखील अटक केली होती. पुणे शहर गुन्हे शाखेचे पोलिस रवींद्र बर्हाटेच्या युध्दपातळीवर मागावर होते. दरम्यान, काही दिवसांपुर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रवींद्र बर्हाटेला अटक केली. त्यानंतर आज पुणे शहर पोलिसांनी देवेंद्र जैन याला अटक केली आहे. त्याबाबत पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी माहिती दिली आहे. देवेंद्र जैन याच्याकडे दाखल गुन्हयाबाबत सखोल तपास केला जाणार आहे. गुन्हयाचा पुढील तपास पुणे शहर पोलिस करीत आहेत.