मुंबई – आमागी लोकसभा निवडणुक शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कायम ठेवला असून स्वपक्षाच्या खासदारांनाही तशा प्रकारचा ‘अिल्टमेटम’ दिला आहे. ज्यांना युतीवरच भरोसा आहे त्यांनी स्वबळावर लढायचे की नाही याचा निर्णय घ्यावा. शिवसेना मात्र स्वबळावरच लढणार आहे, अशा शब्दांत पक्षप्रमुखांनी खासदारांना बजावले असल्याची माहिती खात्रीदायक सूत्रांनी दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या या निर्धार लातूरच्या मेळाव्यात प्रतिहल्ला केल्याचा दावा सूत्रांनी केला.आहे
राज्यात व केंद्रात सत्तेत असतानाही शिवसेनेने भाजपला सतत कडवा विरोध कायम ठेवला. तरीही शिवसेना युती करेल अशी आशा भाजपच्या सर्वच नेत्यांनी वारंवार बोलून दाखवली होती. मात्र, यावेळी लोकसभेत भाजप सोबत युतीने लढायचे नाही, असे स्पष्ट आदेशच पक्षप्रमुखांनी खासदारांना दिल्याची माहीती आहे. ज्या खासदारांना युती व्हावी असे वाटते त्यांना उद्धव ठाकरे यांनी नुकतेच युतीचा विचार सोडण्याचे बजावले आहे.