पुणे,दि ३० :- पुणे शहरातील झोन वन चे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डी. सी. पी. प्रियांका नारनवरे यांची एक ऑडियो क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व व्हायरल होत असलेल्या ऑडियो क्लिपमध्ये एक महिला अधिकारी दमदाटी वजा आज्ञा देताना ऐकायला मिळत आहे.मात्र, खात्रीदायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्हायरल होणाऱ्या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा डी. सी. पी. प्रियांका नारनवरे यांचा नसून तो बनावट ऑडियो आहे. संबंधित अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी ही बनावट ऑडियो क्लिप व्हायरल केली जात असून त्यांच्याविरोधात राजकारण व षडयंत्र रचले जात असल्याची माहिती मिळत आहे. त्यांच्या पदावर येऊ इच्छणाऱ्या अन्य अधिकाऱ्याने बनावट ऑडियो क्लिप तयार करून व्हायरल केल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी सायबर सेलकडून व्हावी अशी मागणी केली जात आहे.
पुणे शहरात अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी आपल्या कामाशी तत्पर असल्याचे आपण पाहिले आहे. डीसीपी प्रियांका नारनवरे या देखील कर्तव्यदक्ष महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. मात्र आता अधिकाऱ्यांविरुद्ध असे षडयंत्र होत असेल तर याचा न्याय कुठे होणार? आणि अधिकारी अश्या षडयंत्राला बळी पडत असतील ते सामान्य नागरिकांचे काय हाल होणार, ही विचार करण्याची बाब आहे.
आवाजाची मिमिक्री करून हॉटेलमधून जेवण मागवण्याची ऑडिओ क्लिप व्हायरल वायरल..ऑडिओ क्लिप तयार करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होणार.