पुणे दि१८:- आज रोजी पुणे महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख सह-महापालिका आयुक्त श्री. ज्ञानेश्वर मोळक आणि प्रमुख आरोग्य निरिक्षक आय.एस. इनामदार व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी(पुणे) नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रास्ता पेठ येथे पुणे महानगरपालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाने कारवाई केली असता ६०० किलो प्लास्टीक आणि नाॅन-ओव्हन बॅग्ज जप्त करून रू ५,०००/- दंड वसूल करण्यात आला आहे.