पुणे, दि.१६ :- पुणे शहर पोलिसांनी सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेच्या वतीने ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवण्यात आली.या मोहिमेत पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन व तपासणी करुन कारवाई केली. हे कोम्बिंग ऑपरेशन बुधवारी (दि.15) रात्री 11 ते गुरुवारी (दि.16) मध्यरात्री एक या कालावधीत राबवण्यात आले.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करुन गुन्हेगारांना चेकींग करुन प्रतिबंधक कारवाई करणे, हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयीत व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या मोहीमेत तब्बल 3213 गुन्हेगारांना चेक कररण्यात आले असून त्यापैकी 817 गुन्हेगार मिळून आले आहेत.कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 10 हजार 720 रुपयांचे 33 कोयते, 3700 रुपयांच्या 8 तलवारी, 500 रुपयांचा एक चॉपर जप्त करुन 13 आरोपींना अटक केली आहे. तर 38 केसेस दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई खडक, फरासखाना. स्वारगेट, सहकारनगर, बंडगार्डन, भारती विद्यापीठ, वारजे माळवाडी, सिंहगड रोड, खडकी, येरवडा, चंदननगर, हडपसर, लोणी काळभोर आणि गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
गुन्हे शाखा युनिट एकने खडक पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात करण उर्फ ठोम्ब भानुदास आगलावे (वय-18), नामदेव महेंद्र कांबळे (वय-21) याला अटक केली आहे तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 6 हजार रुपये किंमतीचे 10 किलो तांब्याचे पाईप जप्त केले. तर युनिट तीनच्या पथकाने भोसरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाहिजे असलेला सराईत गुन्हेगार अक्षय उर्फ जंगल्या राजु भालेवर (वय-25 रा. महादेव आळी, दापोडी गावठाण) याला अटक केली.
गुन्हे शाखा युनिट पाच च्या पथकाने हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी पंकज विठ्ठल कांबळे (वय-19, रा. हडपसर) याला अटक करुन एका विधीसंघर्षीत बालकाला ताब्यात घेऊन हडपसर पोलिसांच्या ताब्यात दिले. तसेच युनिट सहाने निगडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पाहिजे असलेला आरोपी कनवरसिंह कालुसिंग टाक (वय-21 रा. हडपसर ) याला अटक केली.
खंडणी विरोधी पथकाने विना परवाना पिस्टल बाळगणाऱ्या पियुष उर्फ कान्हा सतीश जाधव (वय-19 रा. शिवणे) याला अटक केली. त्याच्याकडून 25 हजार 100 रुपयांचे पिस्टल आणि एक काडतुस जप्त करुन उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
अंमली पदार्थ विरोधी पथक एकने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघांना अटक करुन
त्यांच्याकडून 95 हजार 200 रुपयांचा गांजा आणि एमडीएमए च्या पिल्स जप्त केल्या.
तर पथक दोनने येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 80 हजार रुपयांचा गांजा जप्त करुन एकाला अटक केली.
पोलीस स्टेशनने मुंबई प्रोव्हिबिशन अॅट अंतर्गत 18 केसेस दाखल करुन 8 आरोपींना अटक केली आहे.
त्यांच्याकडून 15 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सीआरपीसी कायदा आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत 102 आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.
तसेच 181 हॉटेल, लॉजची तपासणी करण्यात आली.
नाकाबंदी कारवाईमध्ये 754 संशयित वाहन चालकांना चेक करुन 38 जणांवर कारवाई करण्यात आली.
वाहतूक शाखेने 61 दुचाकी, 24 तीन चाकी, 31 चारचाकी आणि एका जड वाहने अशा एकूण 117 जणांवर कारवाई केली.ही कारवाई.अमिताभ गुप्ता , पोलीस आयुक्त , पुणे शहर यांचे आदेशान्वये , पोलीस सहआयुक्त डॉ . रविंद्र शिसवे , अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग राजेंद्र डहाळे , अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण , अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे , पोलीस उप आयुक्त , परिमंडळ १ श्रीमती प्रियंका नारनवरे , पोलीस उप आयुक्त परिमंडळ २ सागर पाटील , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ श्रीमती पोर्णिमा गायकवाड , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ४ रोहिदास पवार , पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५ श्रीमती नम्रता पाटील , पोलीस उप आयुक्त , वाहतुक विभाग श्री राहुल श्रीरामे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा व पोलीस ठाणेकडील अधिकारी / अंमलदार तसेच वाहतुक विभागाकडील अधिकारी / अंमलदार यांचे पथकाने संयुक्तपणे उपरोक्त कामगिरी केली आहे . यापुढेही कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात येवून गुन्हेगारांचे हालचालींवर सक्त नजर ठेवून त्यांचेवर प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे .