पुणे,दि.१८ :- पुणे शहरातील सुप्पर इंदिरा नगर , बिबवेवाडी पुणे.येथे पुर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून चोघांनी मिळून 21 वर्षीय तरूणावर कोयत्याने सपासप वार करून खून केल्याची घटना बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगरमधील सुवर्णयुग मित्र मंडळाजवळ घडली याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणाला खल्लास केल्यानंतर आरोपींनी त्यांच्याजवळील कोयते हवेत फिरवून शिवीगाळी करुन सगळ्यांना खल्लास करुन टाकीन असे जोरजोरात ओरडुन परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.योगेश रामचंद्र पवार (21, रा. सुवर्णयुग मित्र मंडळ जवळ, सुपर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे. दरम्यान, योगेशचा मित्र वैभव सोमनाथ घाटूळ (22, रा. टिळेकर नगर, कात्रज-कोंढवा रोड, पुणे – याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी विश्वास शिंदे, नागेश फुलारे, सनि भोंडेकर, ओंकार खाटपे यांच्याविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की योगेश पवार, वैभव घाटूळ आणि गणराज ठाकर हे फिर्यादीच्या मोटारसायकलवरून योगेशच्या घरी जात होते. ते सुपर इंदिरानगर येथे आले असता आरोपींनी पुर्वी झालेल्या भांडणावरून योगेशच्या दिशेने रंग फेकला. योगेशने गाडी थांबवून त्यांना जाब विचारला असता आरोपींनी त्यांच्याकडील कोयत्यांनी त्याच्यावर सपासप वार केले. दरम्यान, काही क्षणातच योगेश रक्ताच्या थारोळयात जमिनीवर पडला. त्याला तात्काळ ससून रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, सहाय्यक आयुक्त राजेंद्र गलाडे वरिष्ठ निरीक्षक सुनिल झावरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिता हिवरकर सहाय्यक निरीक्षक प्रविण काळुखे किरण देशमुख उपनिरीक्षक यश बोराटे रामकृष्ण काळे संजय अदलिंग
आदींनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हयाचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक राजकुमार बरडे करीत आहेत.गुन्हा केल्यापासून आरोपी फरार झाले असून बिबवेवाडी पोलिस ठाण्यातीलअधिकारी, कर्मचारी आणि गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचारी आरोपींचा शोध घेत आहेत.
ही घटना धुलीवंदनाच्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास सुपर इंदिरानगर परिसरातील घडली आहे पुडिल तपास पो.उप निरी . संजय अदलिंग करीत आहे