पुणे दि ७ :- पुणे महापालिकेच्या हद्दीतील सर्व अधिकृत फेरीवाले आणि पथारीवाले यांची दि ५ रोजी समिती अंतर्गत उप समितीची बैठक घेण्यात आली यामध्ये प्रामुख्याने मेट्रो कामासाठी आवश्यक असणाऱ्या ठिकाणचे फेरीवाल्यांच्या पुनवर्सन फुड झोन तयार करणे तसेच फेरीवाल्यांच्या प्रमाणपत्र मध्ये दिलेल्या अटी व शर्ती पालन करण्याची चर्चाही करण्यात आली व प्रमाणपत्रअसेल किंवा त्याचे नातेवाईक यांनी व्यवसाय करणे बंधनकारक करण्यात आले आहे व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी पालिकेने दिलेले परवाना प्रमाणपत्र दर्शनी भागात ठळकपणे लावण्याच्या स्पष्ट सूचना अतिक्रमण विभागाने केल्या असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पालिकेच्या शहर फेरीवाला समितीअंतर्गत उपसमितीच्या बैठकीत व्यवसाय करताना अटी-शर्तींचे पालन करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली. त्याअंतर्गत, यापुढील काळात शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई वाढविण्यासाठी सर्व अधिकृत फेरीवाल्यांनी त्यांचे प्रमाणपत्र दर्शनी भागांत ठळकपणे लावण्याचे बंधन घालण्यात आले आहे. अधिकृत व्यावसायिकांचा स्टॉल/हातगाडी काही काळासाठी बंद राहणार असल्यास त्याची लेखी माहिती क्षेत्रीय कार्यालयाला कळविण्यात यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम तीव्र करण्यात येणार असल्याने अधिकृत व्यावसायिकांवर कारवाई होऊ नये, यासाठी परवाना प्रदर्शित करणे किंवा योग्य माहिती विभागाला कळविण्याची जबाबदारी व्यावसायिकांची पूर्ण करावी, असे आवाहन अतिक्रमण विभागाने केले आहे.