पुणे ग्रामीण,दि.१३:-पुणे ग्रामीण परिसरातील येवत ठाणे पोलिसांकडून काही दिवसांपासून अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याची मोहीम सुरू केली आहे. यामध्ये अवैध दारूभट्ट्या, अवैध गौणखनीज उत्खनन, जुगार अड्डे. गुटखा विक्रीवर कारवाई सुरू केली आहे.यवत (ता. दौंड) पोलिसांनी काही महिन्यांमध्ये जुगार व अवैध धडक कारवाई करून व्यवसाय बंद केला आहे या व्यवसायातून एका टोळक्याने एका व्यावसायिकाला जायबंदी केले आहे. त्यामुळे अनेक वर्षे भूमिगत असलेल्या या व्यवसायाने अचानक डोके वर काढले. त्यातून यवत पोलिसांची नाचक्की झाली होती. त्यामुळे आता यवत पोलिसांची वक्रदृष्टीच या व्यवसायांवर पडली आहे.
पोलिसांकडून छोट्या अवैध व्यवसायांवर सातत्याने कारवाई झालीच पाहिजे. या छोट्या अवैध व्यवसायांमध्ये मोठ्या गुन्ह्यांचे बीज रोपले जाते. त्यांना आळा घालण्यासाठी या तणाची खुरपणी, कोळपणी करावीच लागते. मुख्य म्हणजे अवैध व्यवसायांवर कारवाई करणे हे पोलिसांचे कामच आहे. यवत पोलिस यापुढेही आपले काम करतच राहतील.
– हेमंत शेडगे, पोलिस निरीक्षक यवत