धर्माबाद,दि.१३ :- प्रतिनिधी.स्वच्छ भारत, स्वच्छ शहर’चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. शहर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे. परंतु, शहरात सरस्वती नगर (वार्ड क्र.5) भागासह काही भागात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. विशेष सरस्वती नगर भागात नाल्या तुंबल्या असून, रस्त्यावरच कचऱ्याचे ढिगारे दिसतात. यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून, त्यांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे. शहरांतील वार्ड क्रमांक पाच मधील सरस्वती नगर भागात राहणाऱ्या नागरिकांना तुडुंब भरलेल्या नाल्यांच्या दुर्गंधीचां त्रासही सहन करावा लागत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने या गटारी आणखी भरून दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य वाढणारच आहे त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून या परीसरातील नाल्यांची दुर्गंधी व स्वच्छता तसेच साफ सफाई करणे अवश्यक बनले आहे.
नगर पालिकेतील स्वच्छता विभागाने दखल घेऊन या पासून गोर गरीब नागरीकांना होणारा त्रास त्वरित बंद करावी अशी मागणी लेखी पत्राद्वारे सौ.मीना राजू भद्रे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर उपाध्यक्ष धर्माबाद यांनी नगर पालिकेला कळवली
याच घानी मुळे व नालितील दुर्गंधी पाण्यामुळे डेंग्यू चे डास चावल्याने दोन जणांना डेंग्यू झाला त्यामुळें नगर पालिकेने आतातरी जागे होणे गरजेचे आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येई पर्यंत का वाट बघत आहेत असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे.
सिध्देश्वर मठपती- धर्माबाद प्रतिनिधी