नांदेड,दि.१५:-मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस असतो. राज ठाकरेंच्या वाढदिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्रसैनिक हे शिवतिर्थावर येत असतात. मात्र यावेळी राज ठाकरेंनी महाराष्ट्रसैनिकांना एक आवाहन केलंय. यावेळी शुभेच्छा द्यायला येताना कुणीही पुष्पगुच्छ आणि मिठाई घेऊन येऊ नका. तर येताना एखादं झाडाचं रोप किंवा शैक्षणिक साहित्य घेऊन या असं आवाहन केलं. तसंच या शैक्षणिक वस्तू या गरजू विद्यार्थ्यांना दिल्या जातील असंही राज ठाकरेंनी आपल्या पत्रात म्हटलंय. त्या आव्हानाचे धर्माबाद तालुका व शहर शाखेच्या वतीने पालन करत हिंदु जननायक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५५ व्या
वाढदिवसानिमित्त धर्माबाद येथील मनसे
कार्यकर्त्यांकडून शहरातील बसवन्ना हिल्स येथे वृक्षारोपण करण्यात आले. पदाधिकाऱ्यांनी विविध प्रकारचे वृक्षांचे वृक्षरोपण करून पक्षप्रमुखांना वाढदिवसाच्या आगळ्या वेगळया अनोख्या शुभेच्छा दिल्या. व निसर्गाचे आणी पर्यावरणाचे समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे ही काळाची गरज असून त्या वृक्षरोपणातून एक चांगला संदेश पक्षाच्या वतीने देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. वृक्षारोपण करून धर्माबाद शहरातील गरीब विद्यार्थ्यी जिल्हा परिषद कन्या शाळा शिक्षणाचे धडे गिरवत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याच्या कीटचे वाटप करण्यात आले.
शिक्षण हे वाघिणीचे दूध म्हटले जाते परंतु आर्थिक अडचणीमुळे असंख्य गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य होत नाही. सध्याची वाढती महागाई पाहता शिक्षणासाठी लागणारे साहित्यही अतिशय महाग झाले आहेत. शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी तालुका अध्यक्ष दत्तात्रय कावडे,मनसे तालुका उपाध्यक्ष सतीश माळगे, शहर उपाध्यक्ष गजानन मुड्डेवाड , रंजीत सिंह ठाकुर, मनसे वाहतूक सेना शहर अध्यक्ष, शिवा तोटलोड, माजी तालुका अध्यक्ष नागनाथ माळगे शालेय व्यवस्थापन समिती सदस्य भगवान कांबळे, जिल्हा परिषद कन्या शाळेचे श्री.माधव हिंमगीरे सर ,श्रीमती जोशी मॅडम श्रीमती एस. ए. खेडकर मॅडम सह विद्यार्थ्यी उपस्थित होते.
सिध्देश्वर मठपती धर्माबाद (प्रतिनिधी)