नांदेड धर्माबाद,दि.१७ :- येथील लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयात १४ जून जागतिक रक्तदाता दिनानिमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतीक व ग्रंथालय विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कमलाकर कणसे, उपप्राचार्य डॉ. योगेश जोशी यांच्या उपस्थितीत महाविद्यालयात रक्तदान जनजागृती रॅली काढण्यात आली. प्राचार्य डॉ. कणसे यांनी मनोगत व्यक्त करताना रक्तदानाचे महत्व सांगून उपस्थितांना रक्तदान करण्याचे आवाहन केले.
त्यानंतर नांदेड येथील गोळवळकर गुरुजी रक्तपेढीच्या कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरात सहभागी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी रक्तदात्याकडून रक्त संकलन केले.
. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी गोळवळकर गुरुजी रक्तपेढीचे बालाजी शिंदे, राष्टीय छात्र सेना विभाग प्रमुख प्रा. अब्दुल माजिद, आर्मीचे जवान राम सेवक, सुरेश सिंग,ग्रंथपाल डॉ. शरद चव्हाण, रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी डॉ. संभाजी मनूरकर, सोनू पालकृतवार, माजी विद्यार्थी संतोष साखरे राष्ट्रीय छात्र सेना कॅडेट्स यांनी प्रयत्न केले.
याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नांदेड धर्माबाद प्रतिनिधी :- सिध्देश्वर मठपती