पिंपरी चिंचवड,दि.२७ :- पिंपरी-चिंचवड दरोडा विरोधी पथकाने पोलीसांनी केलेल्या कारवाईत दोघांना चार पिस्टल व 14 जिवंत काडतुसासह रविवारी दि.२५ रोजी अटक केली आहे. अटक आरोपी चे नाव, प्रमोद सोपान सांडभोर (वय 33, रा. तळेगाव दाभाडे) व शरद मुरलीधर साळवे (वय 30, रा. काळेवाडी), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, यांना शस्त्र पुरवणाऱ्या तिघांचा शोध सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की सराईत आरोपी प्रमोद सांडभोर हा रविवारी तळेगाव दाभाडे बस स्टॅन्डजवळ शस्त्रासह येवून ते मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत आहेत. अशी खबर मिळाली. त्यानुसार रविवारी रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी बस स्टँड परिसरात सापळा लावला.
आरोपी हे निळ्या रंगाच्या अल्टो कारमधून खाली उतरले. त्यांच्या कंबरेला पिस्टल होत. पोलिसांचा सुगावा लागताच ते दोघे वेगवेगळ्या दिशेने पळत सुटले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना अटक केली. यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता दोन पिस्टल, ४ जिवंत काडसुते मिळाली तर कारची तपासणी केली असता त्यात दोन आणखी पिस्टल व १० जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली.
दोन्ही अटक आरोपी हे सराईत गुन्हे गार असून त्यांनी मध्यप्रदेशमधून इतर दोघांकडून पिस्टल व काडतुसे आणली होती. सांडभोर याच्या विरोधात खून, खूनाचा प्रयत्न असे ८ गुन्हे दाखल आहेत, तर साळवी याच्या विरोधात खून मारामारी, बलात्कार असे तीन गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार ते मोठा कट रचत होते. जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत किशोर आवारे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी तयारी करत असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या कटामध्ये आणखी तीन जण सहभागी असल्याचे समोर आले आहे. आरोपींवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
इतर साथीदार कोण आहेत त्याबाबत पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम हे अधिक तपास करीत आहेत.
सदर उल्लेखनीय कामगिरी ही विनयकुमार चौबे. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, पिं. चिं. स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पिं चि., सतिश माने. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पिं चिं. बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पिं चिं. यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र कदम, पोलीस निरीक्षक, दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, पोलीस अंमलदार आशिष बनकर, प्रविण कांबळे, गणेश कोकणे, गणेश हिंगे, गणेश सावंत, विनोद वीर सुमित देवकर, महेश खांडे, उमेश पुलगम, प्रविण माने, राजेश कौशल्य, राहुल खारगे, समिर रासकर, नितीन लोखंडे, चिंतामण सुपे व अमर कदम सर्व नेमणुक दरोडा विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी केली आहे. सदर उल्लेखनीय कामगिरीबद्दल मा. पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांनी दरोडा विरोधी पथकास उत्तेजनार्थ ५० हजार रुपये चे बक्षीस घोषित केले आहे.