पिंपरी चिंचवड,दि.२८ :- पिंपरी-चिंचवड खंडणी विरोधी पथकाच्या पोलीसांनी केलेल्या कारवाईत ३ सराईत गुन्हेगारांन कडुन १ पिस्टल व २ जिवंत काडतुसासह दि.२४ रोजी अटक केली आहे. अटक आरोपी चे नाव, १) किशोर बापू भोसले वय ३१ रा. पुनावळे गावठाण, ता. मुळशी, जि. पुणे २) अमित दत्तात्रय पाटुळे वय २३ रा. शिंदेवस्ती चौक, रावेत, पुणे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, यांना शस्त्र पुरवणाऱ्या ३)अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले वय ३४ रा. पुनावळे गावठाण, पुणे आशी अटक केल्याय आरोपींनचे नांव आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे व अंमलदार हे दिन २४/०६/२०२३ रोजी अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढत असतांना, पोलीस नाईक आशिष बोटके व प्रदीप गोडांबे यांना गोपनीय माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार किशोर भोसले व अमित पाटुळे हे कोणतातरी गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने, पुनावळे येथील स्मशान भुमी येथे येणार असून, त्यांचेकडे पिस्टल आहे. अशी बातमी मिळाल्याने खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सापळा लावून पकडले,
त्यांच्या कंबरेला पिस्टल होत. पोलिसांचा सुगावा लागताच ते दोघे वेगवेगळ्या दिशेने पळत सुटले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना अटक केली. यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता १ पिस्टल, २ जिवंत काडसुते मिळाली आरोपी यांना ताब्यात घेवुन, त्याचे विरुध्द रावेत पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास दरम्यान त्यांनी सदरचे पिस्टल व राऊंड हे अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले रा. पुनावळे, गावठाण, पुणे याचे सांगणेवरुन तडीपार आरोपी रविराज उर्फ कन्नड्या राजेंद्र केदार याचेकडून आणले असल्याचे सांगितले. खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले वय ३४ रा. पुनावळे गावठाण, पुणे याचा शोध घेवुन त्यास तात्काळ अटक केली. खंडणी विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार व सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे यांनी आरोपी अमोल उर्फ धनज्या गजानन गोरगले याचेकडे सखोल व कौशल्यपूर्ण तपास केला असता, माथाडीचे कामावरुन झालेल्या वादातून, ठराविक उद्देश साध्य करण्याचे हेतूने, आरोपी अमोल गोरगले याने साथीदारांकरवी पिस्टल व राऊंड आणले असल्याचे निष्पन्न झाले असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे सपोनि उध्दव खाडे हे करीत आहेत. अटक आरोपी हे पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असुन, त्याचे विरुध्द हिंजवडी व वाकड पोलीस ठाणे येथे दरोडा, खुनाचा प्रयत्न, जबर दुखापत करणे असे गुन्हे दाखल आहे.सदरची कारवाई विनय कुमार चौबे, पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड. डॉ. संजय शिंदे पोलीस सह आयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप- आयुक्त, गुन्हे, सतिश माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहा. पोलीस निरीक्षक उध्दव खाडे, सहा. पोलीस उप-निरीक्षक अशोक दुधवणे, अमर राऊत तसेच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, रमेश मावसकर, किरण काटकर, सुनिल कानगुडे, प्रदीप गायकवाड, रमेश गायकवाड, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, सुधीर डोळस यांचे पथकाने केली आहे.