पुणे,दि.०१:- पुणे शहरात गुन्हेगारांन वर सहा महिन्यांत संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोका) कायद्यांतर्गत ३१ गुन्हेगारी टोळ्यांवर पुणे शहर पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे. मोका कायद्यांतर्गत २७७ सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे.
तसेच, एमपीडीए कायद्यांतर्गत २४ गुन्हेगारांची थेट कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शुक्रवारी माहिती दिली.पुण्यात एका तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली होती. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रितेश कुमार म्हणाले, ”ही घटना दुर्दैवी होती. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.
शाळा-महाविद्यालयांतील तसेच शालाबाह्य अल्पवयीन मुला-मुलींचे समुपदेशन करण्यात येत आहे. मागील सहा महिन्यांत पोलिस रेकॉर्डवरील १४ हजार ४०० टवाळखोर व गुन्हे गारांनवर विविध कलमांखाली कारवाई केली आहे.
पुणे शहरातील १११ पोलिस चौक्यांना सीसीटीव्हीने जोडण्यात येणार आहे. दोन शिफ्टमध्ये पोलिस चौक्या सुरू राहतील. वरिष्ठ पोलिस अधिकारी त्या पोलिस चौक्यांना अचानक भेटी देतील.”