पुणे,दि.०१:-बोपोडी येथील छाजेड पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका वर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न पेट्रोल पंपा च्या रांगेत असलेल्या पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या दुचाकीचा धक्का लागल्याने त्याचा जाब विचारला. त्यावरुन भाईगिरी करणार्या तिघांनी एकावर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
हवेत कोयता फिरवून आम्ही इथले भाई आहोत, असे ओरडून दहशत पसरविली.
याप्रकरणी पवन पवरचंद घागट (वय ४६, रा. बोपोडी) यांनी खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणेश विष्णु अडागळे
(वय २०, रा. दापोडी) याला अटक केली आहे. त्याचा साथीदार अल्पवयीन मुलावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बोपोडीतील छाजेड पेट्रोल पंपावर शुक्रवारी दुपारी ४ वाजता घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि ३० रोजी दुपारी ४ वा. चे सुमारास छाजेड पेट्रोल, बोपोडी, फिर्यादी,छाजेड पेट्रोल पंपावर पेट्रोल भरतेवेळी फिर्यादीचे मागून एका दुचाकीवर बसून तिघे जण आले. त्यांच्या गाडीचा धक्का फिर्यादी यांच्या गाडीला लागला. त्याचा फिर्यादी यांनी जाब विचारल्यावर आरोपींनी त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली.आम्ही या एरियाचे भाई आहोत, तू ओळखत नाही काय,असे म्हणून त्यांच्यातील एकाने कमरेच्या शर्टखाली ठेवलेला कोयता काढून फिर्यादीवर वार करुन गंभीर जखमी केले.त्याने हवेत कोयता फिरवून तेथे उपस्थित लोकांना दमदाटी करीत दहशत पसरविली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आण्णा गुंजाळ हे करीत आहेत.