पुणे,दि.०५ :- पुणे शहरातील समर्थ पोलिसांनी नाना पेठेतील मच्छी मार्केटमध्ये मोबाईल चोरी करणार्या एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून तब्बल 5 लाख 9 हजार रूपये किंमतीचे तब्बल 29 स्मार्ट फोन जप्त करण्यात आले आहेत.
कुंदनकुमार अर्जुन माहातो (25, रा. झारखंड. सध्या रा. मुंबई, अंधेरी असे अटक केलेल्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी की, पुणे शहर पोलिसांचे दि.3 ते 4 रोजी 2 वाजेपर्यंत कोम्बींग
ऑपरेशन सुरू असताना पोलिस हवालदार रोहिदास वाघीरे आणि पोलिस हवालदार जितेंद्र पवार यांना एक जण नाना पेठेतील मच्छी मार्केटमध्ये संशयास्पद उभा असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.व खातरजमा केल्यानंतर पोलिस पथकाने आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मच्छी मार्केटमध्ये मच्छी खरेदी करण्यासाठी आलेल्यांचे मोबाईल चोरून परराज्यात विकत असल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली. त्यामध्ये पोलिसांना 5 लाख 9 हजार रूपये किंमतीचे एकुण 29 स्मार्ट फोन आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले आहेत.
पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील,
पोलिस उपायुक्त संदिप सिंह गिल्ल, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय भोसले, पोलिस हवालदार रोहिदास वाघिरे, जितेंद्र पवार, गणेश वायकर, प्रमोद जगताप, पोलिस नाईक रहिम शेख, पोलिस अंमलदार कल्याण बोराडे, अमोल शिंदे, शरद घोरपडे, संदिप पवार, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, हेमंत पेरणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.