पुणे,दि.११:-पुणे शहरातील क्लब, पब मध्ये डीजे वाजवण्यासाठी आता 10 वाजेपर्यंत वेळेचे बंधन आल्या नंतर, क्लब, पब, व बार वाल्यांनी लढवली नवीन शक्कल
हॉटेल, पब आणि रेस्टॉरंटमध्ये डी.जे. किंवा साउंड सिस्टिमवर च्या आवाजामुळे स्थानिक नागरिकांना त्रास होतो.हे पुणे शहर पोलिसांना नागरिकांनी लक्षात आनुन दिल्या नंतर, पुणे शहर पोलिसांनी नियमित तपासणी सुरू केली आहे.
व पोलिसांच्या निदर्शनास आल्यानंतर शनिवार सह इतर दिवशीही कारवाई सुरू केली आहे त्या दरम्यान, काही पब चालकांनी नवीन शक्कल लढवली आहे ब्लूटूथ कनेक्टेड हेडफोन उपलब्ध करून.यातून ग्राहकांना संगीताचा आस्वाद घेता येईल आणि नियमही मोडला जाणार नाही, अशी शक्कल त्यांनी लढवली आहे.पुणे
पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दि १ पासून सर्व पोलीस ठाण्यांना व गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांना अशा आस्थापनांची झडती घेण्याचे आदेश दिले.आहे व या वर्षी जून अखेरपर्यंत पोलिसांनी 35 हॉटेल, पब व रेस्टॉरंटवर कारवाई करून.कारवाईत म्युझिक सिस्टिम व इतर साहित्यही जप्त केली आहे.व झुंजार च्या संपादक यांच्या शी बोलताना आयुक्त म्हणाले, “पब, हॉटेल्स चालकांनी कायद्याचे पालन करावे. त्यांच्याकडून समाजाला होणारा उपद्रव सहन केला जाणार नाही. परवान्यानुसार संगीत वाजवण्याची वेळ ठरवून दिलेली आहे. यातील काही व्यावसायिकांना रात्री साडेदहाची मुदत आहे. ही कारवाई मोकळ्या जागेतील आस्थापना आणि रूफ टॉप रेस्टॉंरंटशी संबंधित आहे. बंदिस्त जागेत चालणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंटना नियम पाळण्याचे, आवाज बाहेर जाणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहनही केले आहे.’
व पुणे शहरातील काही इमारतींवरील रेस्टॉरंट्स व काही हॉटेलांमुळे उपद्रव होत आहे. स्थानिक रहिवासी मोठ्या आवाजामुळे त्रस्त होतात व शनिवारी हा गोंगाट आणखी वाढतो. यामुळे झोपही लागत नाही, अशी तक्रार स्थानिक रहिवासी पोलिसांना आल्या आहेत. शिवाय, काही हॉटेल किंवा पब पहाटे 3.30 किंवा 4 पर्यंत मोठ्या आवाजात संगीत वाजवतात. या ठिकाणी शनिवारी मोठ्या प्रमाणात तरुणांची गर्दी असते.
अशा ठिकाणी गुन्हे शाखेचे अधिकारी पब आणि हॉटेल्सना भेट देऊन डेसिबल पातळी तपासणार आहे
रात्री उशिरापर्यंत संगीत वाजवणारी रेस्टॉरंट आणि भोजनालये तपासण्याचे गस्ती पथकांना आदेश
उल्लंघन करणाऱ्यांचे व्हिडिओ चित्रीकरण आणि डेसिबल पातळी तपासणी ही होणार आहे
कारवाईत म्युझिक सिस्टिम आणि इतर साहित्यही जप्त होणार असून त्या हॉटेल चालकावर गुन्हा दाखल होणार आहे