पुणे,दि.११:- दर महीना पाच हजार रुपये हप्ता द्यायाचा व रोज एक क्वॉटर दारु देण्यास नकार दिल्याच्या रागातून व्यावसायिकाला चाकुचा धाक दाखवुन खंडणी मागितल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. हा प्रकार डेक्कन परिसरातील एका वाईन्स दुकान सोनल हॉलचे बाजुला कर्वेरोड पुणे येथे ११ जुलै २०२३ रोजी रात्री ७ च्या सुमारास घडला. याप्रकरणी एका जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज रोहीदास नलावडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सतिष शंकरलाल मुलचंदानी वय ४० वर्ष धंदा व्यापार रा. वाकड पुणे. यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या वाईन्सच्या दुकानात असताना तिथे आलेल्या सुरज नलावडे याने दर महीना पाच हजार रुपये हप्ता द्यायाचा व रोज एक क्वॉटर दारु द्यायाची अशी मागणी केली व त्यला दारु व पाच हजार रुपये हप्ता न दिल्याने
याचा राग मनात धरुन आरोपीने त्यांच्यासोबत वाद घातला. त्यांच्या चाकुचा धाक दाखवुन मला व माझे कामगारांना खलास करुन टाकण्याची व तुला येथे दुकान चालु देणार नाही अशी धमकी देवुन माझे कडुन एक आय.बी. कंपनीची दारुची बाटली धमकावुन घेवुन गेला, शिवीगाळ केली. तसेच त्यांना हाताने मारहाण केली. मुलचंदानी यांनी याबाबत पोलिसांना सांगितले. पोलिसांना सांगितल्याच्या कारणावरुन आरोपीने वाईन्सच्या दुकानात बोर्ड फाडुन वाईन्स चालवायचे असेल तर दरमहा पाच हजार रुपये व एक क्वॉटर दारु हप्ता मागितल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.सदरची कारवाई. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त परिमंडळ – १ संदिपसिंह गिल, कुवर सहा पोलीस आयुक्त, विश्रामबाग विभाग पुणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस, पोलीस निरीक्षक गुन्हे शंकर साळुंके यांचे मार्गदर्शनाखाली तपासपथकातील पोलीस उप निरीक्षक महेश भोसले, संदिप जाधव, दत्तात्रय सांवत पोलीस अंमलदार शिंदे, गभाले. माळी, जाधव, पाथरुट,आल्हाट, गायकवाड, चौबे, साडेकर, बडगे, काळे, बोरसे यांनी कारवाई केली. तसेच डेक्कन परिसरामध्ये कोणत्याही व्यापारी अगर सामान्य नागरिकांना काही अडचन असल्यास डेक्कन पोलीस ठाणे येथे संपर्क करावा व
पुढील तपास. पोउनि.महेश भोसले, करीत आहेत.