पुणे,दि.२५:- पुणे शहरातील भांडारकर रोड व विधी महाविद्यालय परिसरात पुणे महापालिकेच्या वतीने अनधिकृत हॉटेलच्या शेडवर अतिक्रमण नियंत्रण विभाग व बांधकाम विभाग यांनी कारवाई करण्यात आली. ही मोहीम तीव्र करत अनधिकृत दुकानासमोरील शेड व अनधिकृत दुकाने काढण्यात आली आहे
अतिक्रमण नियंत्रण विभाग व बांधकाम विभागाचा
मोठ्या फौजफाट्यासह जबर दणका दिला.यावेळी अधिकारी व कर्मचारी यांनी भांडारकर रोड व विधी महाविद्यालय परिसरात अनधिकृत सुमारे २५ हजार चौरस फूट अनधिकृत क्षेत्र बांधकाम विकास विभाग व अतिक्रमण नियंत्रण विभाग च्या वतीने मोकळे करण्यात आले.
जेसीबीने पाडण्यात आले.फौजफाटा आणि प्रशासनाचा ‘मूड’ पाहून कारवाईला कोणीही विरोध केला नाही. या होटल वर यापुर्वी 3 वेळा कारवाई करण्यात आली होती. मात्र तरीही परत परत विनापरवाना बांधकाम केले जात होते. यामुळे मालक आणि चालक यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना कळविण्यात आले असून दोन दिवसात गुन्हा दाखल केला जाईल त्याच प्रमाणे सदर हॉटेल चा मद्य परवाना रद्द करणेत यावा असे राज्य उत्पादन शुल्क विभाग यांना कळविण्यात येणार आहे असे उप अभियंता सुनील कदम यांनी सांगितले.
यावेळी सेनापती बापट रस्त्यावरील वेताळ बाबा चौक जवळील.,नव्याने बांधण्यात येत असलेली 100 फुट × 50 फुट मापाची शेड पाडण्यात आली.
या कारवाईत जेसीबी, गॅस कटर ,10 बिगारी इ चा वापर करण्यात आला.
मा. बिपिन शिंदे कार्यकारी अभियंता, सुनिल कदम उप अभियंता, राहुल रसाळे यांचे मार्फत कारवाई करण्यात आली.