पुणे,दि.३० : – पुणे शहरात व इतर परिसरात वेगवेगळ्या ऑनलाइन माध्यमातून मोबाईल फोन मागवणाऱ्या ग्राहकांना मोबाईल फोनच्या बॉक्समध्ये फरशीचा तुकडा आणि साबणाची वडी, बंद असलेले जुने मोबाईल पाठून फसवणूक केल्याचे पुण्यात समोर आले आहे. ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या डिलिव्हरी कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांना पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले आहेत.मोईन मोहम्मद हलीम सय्यद (वय -३० रा. तळेगाव दाभाडे), आकाश राजकुमार निकम (वय-३२ रा. विमाननगर, पुणे), रणजितकुमार राजगीर मंडल (वय-२५ रा. महंमदवाडी पुणे), तुकाराम कृष्णा चौगुले (वय-३० रायकरमळा, धायरी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. त्यांच्याकडून ४ लाख ५१ हजार ४३ रुपयांचे वेगवेगळ्या कंपनीचे १९ मोबाईल जप्त केले आहेत.
पुणे शहर खंडणी विरोधी पथकाने तपास करत असताना हडपसर येथे ऑनलाइन मोबाईल फोन मागवणाऱ्या ग्राहकांना मोबाईल फोन ऐवजी फरशीचे तुकडे, साबणाच्या वड्या, बंद पडलेले मोबाईल मिळाल्याच्या काही दिवसापूर्वी तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर मोबाईल शॉपीचे मालक यांनी त्यांचे मोबाईल शॉपी मधून ग्राहकांनी ऑनलाइन मागवलेले ३१ मोबाईल फोनचा अपहार करुन ४ लाख २७ हजार ३१९ रुपयांची फसवणुक केल्याची फिर्याद हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.व पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
खंडणी विरोधी पथकाकडून समांतर तपास करत असताना पोलीस अंमलदार विनोद साळुंके व अमोल पिलाने यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनीकाही डिलिव्हरी कंपनीच्या चार कर्मचाऱ्याना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला. आरोपी डिलिव्हरी कंपनीकडे स्कॅनर, डिलिव्हरी बॉय, चालक म्हणून काम करतात. मोबाईल शॉपीमधुन मोबाईल फोन घेतल्यानंतर परस्पर त्या बॉक्समधून मोबाइल काढून त्यामध्ये फरशीचे तुकडे, साबणाच्या वड्या ग्राहकांना देऊन मोबाईल शॉपी मलकाची व ग्राहकाची फसवणूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त. रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे २ सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक – २. गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहा.पो.निरी. चांगदेव सजगने, पो.उप निरी.मोहनदास जाधव, पो.उप निरी श्रीकांत चव्हाण पोलीस अंमलदार विनोद साळुंके, ईश्वर आंधळे, अनिल मेंगडे, चेतन शिरोळकर, किशोर बर्गे, राहुल उत्तरकर, चेतन आपटे, संग्राम शिनगारे, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, प्रदिप शितोळे, आशा कोळेकर, प्रदीप गाडे यांनी केलेली आहे