पुणे,दि.०१:- पुणे शहरातील बाणेर येथील सरकारी विद्युत ठेकेदाराकडून ५० हजार रुपये लाच स्वीकारताना महावितरण कार्यालयाच्या बाणेर उपकेंद्रातील सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. रविंद्र नानासाहेब कानडे (वय-३७) असे लाच घेताना पकण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. पुणे एसीबीच्या पथकाने ही कारवाई शुक्रवारी (दि.०१) महावितरण कार्यालय उपकेंद्र बाणेर येथील कर्यालयाच्या आवारात केली.
याबाबत एका ठेकेदाराने पुणे एसीबीकडे तक्रार केली होती. व तक्रारदार हे सरकारी विद्युत ठेकेदार आहेत. त्यांना आर.एम.सी. प्लांटसाठी लागणाऱ्या विद्युत पुरवठा करण्याचा ठेका मिळाला होता. हे काम शासकीय योजना १.३ टक्के तत्वाच्या नियमानुसार पूर्ण केले आहे. या कामाचा पुर्णत्वाचा दाखला देण्यासाठी उपकेंद्र बाणेर कार्यालयातील सहायक अभियंता रविंद्र कानडे यांनी तक्रारदार यांच्याकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांनी याबाबत पुणे एसीबी कार्यालयात कानडे विरुद्ध तक्रार केली. एसीबीच्या पथकाने २८,२९ ते ३१ ऑगस्ट रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता त्यानुसार पथकाने शुक्रवारी उपकेंद्र बाणेर कार्यालयाच्या परिसरात सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम घेताना रविंद्र कानडे याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आहे. पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत.
ही कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे
पोलीस अधीक्षक अमोल तांबे,
अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.
लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.
१. हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक १०६४
२. अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे दुरध्वनी क्रमांक ०२०-२६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३ –
३. व्हॉट्स अॅप क्रमांक पुणे – ७८७५३३३३३३
४. व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई – ९९३०९९७७००
५. ई-मेल आयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in –
६. वेबसाईट – www.acbmaharashtra.gov.in
७. ऑनलाईन अॅप तक्रार – www.acbmaharashtra.net.in