पुणे ग्रामीण,दि.०२:- पुणे ग्रामीण. वडगांव निंबाळकर. सोमेश्वर कॉलेज परीसरात कोयत्याचा धाक दाखवुन दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाला वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशन पोलिसांनी अटक केली. अशी माहिती वडगांव निंबाळकर. पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस उपनिरीक्षक डि.एस. वारूळे यांनी दिली. याप्रकरणी तेजस उर्फ दादु विजय सवाणे वय २२ वर्षे, रा. वाघळवाडी ता. बारामती जि. पुणे याला अटक करण्यात आली आहे. याबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक. वारूळे म्हणाले कि काकडे कॉलेज समोरील निरा बारामती रोडवर तेजस उर्फ दादु विजय सवाणे हा हातात लोखंडी कोयता घेवुन मोठ मोठ्याने आरडाओरड करुन शालेय मुलांचे समोर दहशत निर्माण करत असलेला तरुण हातात कोयता घेऊन हातवारे करून धाक दाखवुन दहशत निर्माण करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली . परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वडगांव निंबाळकर. पोलीस स्टेशनच्या पोलिस पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन तरुणाला ताब्यात घेतले.त्याच्या ताब्यातील कोयता जप्त केला. तपासणी केली असता सोशल मीडियावर कोयता गॅंगचे व्हिडिओ पाहून दहशत निर्माण करण्यासाठी या तरुणांनी हे कृत्य केले असल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे.
गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास सहा. पोलीस उपनिरीक्षक डि.एस. वारूळे हे करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक बारामती विभाग. आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती उपविभाग.गणेश इंगळे,यांचे मार्गदर्शनाखाली वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सचिन काळे सहा. पोलीस निरीक्षक, योगेश शेलार पोलीस उपनिरीक्षक, सहा. पोलीस उपनिरीक्षक दिपक वारूळे, पोलीस हवालदार रमेश नागटीळक, अनिल खेडकर, अमोल भोसले, सागर देशमाने, अमोल भुजबळ, पोपट नाळे, पोलीस मित्र अजित नलवडे यांनी केली आहे.
अवाहन :- अशा प्रकारे कोयत्याने व इतर हत्याराचे सहय्याने दहशत माजविणाऱ्यांवर व सोशल मिडीयावर दहशत पसरवणाऱ्यांवर पुणे ग्रामीण पोलीसांकडुन कठोर कारवाई करण्यात येईल.