पुणे,दि.०३:- पुण्यातील डेक्कन परिसरात चक्क व्हेल माशाची उलटी व्यापारासाठी जवळ बाळगण्यात आलेली होती. पोलिसांनी शिताफीने आरोपीला ताब्यात घेतलं आहे.
दि ०२/०९/२०२३ रोजी डेक्कन पोलीस ठाणे येथे तपास पथकात कार्यरत असणारे पोलीस नाईक सचिन गायकवाड यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली
अत्यंत रहदारीचा परिसर असलेल्या गुडलक कॅफेच्या पाठीमागील बाजूस व्हेल माशाच्या उलटीची विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती.
सदर बातमीची खात्री झाल्यने तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक महेश भोसले यांनी वरीष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनिस डेक्कन पोलीस ठाणे पुणे यांना फोनव्दारे सदरची माहीती कळवून महेश भोसले यांनी तपास पथकातील स्टाफला सदरची माहिती देवून सदर ठिकाणी कारवाई करणेकरीता स्टाफ, वनविभाग भांबुर्डाचे वनरक्षक कृष्णा आनंद हाके य पंचासह जावुन तेथील इसमांना सदर ठिकाणी का उभा आहात याबाबत विचारणा केली असता त्याने असमाधानकारक व उडवाउडवीची उत्तरे देत असताना त्यांच्याकडे असलेली सॅकची तपासणी केली असता सदर सॅक मध्ये
पोलिसांनी पाच कोटी रुपयांची उलटी जप्त करत आरोपींना ताब्यात घेतलं आहे.आरोपीचे नाव.
विश्वनाथ रतन गायकवाड ,वय ३८ वर्ष रा ४६९/९ कात्रज खोपडे नगर गुजरवाडी पुणे. तपासणी केल्यानंतर पोलिसांना त्याच्याकडे व्हेल माशाची उलटी सापडली. त्या उलटीची किंमत तब्बल पाच कोटी रुपये इतकी सांगितली जात आहे. ‘एबीपी माझा’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
भारतासह जगभरात व्हेल नावाच्या माशाच्या उलटीला मोठी मागणी असते. भारतात उलटीला एका किलोमागे एक कोटी रुपये मिळतात तर परदेशात ४ कोटी रुपयांपर्यंत भाव मिळू शकतो. व्हेल माशाच्या उलटीपासून उच्च प्रतीचं सुगंधी द्रव्य आणि पुढे त्यापासून फरफ्युम बनवण्यात येतो.
व्हेल माशाची उलटी आणि माशाचा कुठलाही भाग जवळ बाळगणं आणि व्यापार करणं कायद्यानुसार गुन्हा आहे. पुणे पोलिसांना व्हेल माशाच्या उलटीसंदर्भात माहिती मिळाल्याने मोठी कारवाई करण्यात आली. जप्त केलेली उलटी पाच कोटी रुपयांची असल्याचं सांगण्यात येत आहे.
आरोपी वर गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा तपास पो. उप-निरीक्षक महेश भोसले करीत आहेत.
सदरची कारवाई ही पुणे शहर पोलीस आयुक्त. रितेश कुमार, सह आयुक्त संदिप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त संदिप सिंह गील्ल, वसंत कुँवर सपोआ विश्रामबाग विभाग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विपीन हसबनिस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक महेश भोसले, दत्तात्रय सावंत, पो हया, बोरसे, घनश्री सुपेकर, पो.ना… सचिन गायकवाड, पोलीस अंमलदार रोहित पाथरुट, महेश काळे, धनाजी माळी दशरथ गमाले या पथकाने केलेली आहे