पुणे,दि.०६:- पुण्यातील येरवडा कारागृहातील महिलांना सुदीक्षा फाउंडेशन व प्रायोजक नक्षत्रचे गणेश तुम्मा यांच्या वतीने ४ सप्टेंबर, २०२३ रोजी येरवडा कारागृहातील महिलांना नऊवारी साडी शिवणे प्रशिक्षणाचा शुभारंभ करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ उमा गोपाळे विश्वनाथन यांनी केले.
या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून एव्हरेस्ट वीरांगना सुविधा कडलग आणि माईंड पाॅवर आणि योगा ट्रेनर वासंती देवळे उपस्थित होत्या.
यावेळी हेल्दी आणि निरोगी आयुष्यासाठी ढोलक ताली शिकवण्यात आली.
मनाने हेल्दी राहण्यासाठी चिडचिडेपणा कमी करण्यासाठी ब्रेन जिम ऍक्टिव्हिटीज् घेण्यात आली.
हसतखेळत काऊन्सेलर व ट्रेनर वासंती देवळे मॅडम यांनी जेल मधील कैदींसाठी प्रशिक्षण घेतले.
एव्हरेस्ट वीरांगना सुविधा कडलग यांनी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे थरारक वर्णन ऐकताना सगळ्यांना आपणही त्याच्याबरोबर सफर करत आहोत असेच वाटले.
पुढील टप्प्यात नक्षत्रचे गणेश तुम्मा ह्यांनी दिलेली नऊवारी साडी व तिरंगा ऐवरेस्टवर फडकवून देशाचा मान उंचावली. पल्लवी कदम ह्यांनी गोल पाचवारी साडी व ब्लाउज व गाऊन ह्याचे पण प्रशिक्षण देण्याची विनंती सुदीक्षा फाउंडेशनच्या सौ उमा गोपाळे विश्वनाथन ह्यांना केली.
प्रशिक्षणाच्या पहिल्या बेबी नऊवारी साडी शिवण्यापासून सुरवात करण्यात आली. यासाठी (अर्पिता) अनुराधा तुम्मा, नेहा पवार, अनिता चिंता, उन्नती खैरनार, साची ओसवाल आणि अपर्णा वंगारि या प्रशिक्षका म्हणून काम पाहतील.
याप्रसंगी कारागृह महानिरीक्षक पश्चिम विभाग स्वाती साठे, येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक सुनील ढमाळ, उपअधीक्षक पल्लवी कदम, तुरुंगाधिकारी तेजश्री पवार, पोलीस निरीक्षक पिलारे हे उपस्थित होते.