पुणे,दि.१२:- पुणे शहरात बांगलादेशीं बेकायदेशीररित्या वास्तव्य करणार्या ५ महिलांसह एकुण ७ बांगलादेशींवर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मंगळवार दि १२ रोजी पहाटे धडक कारवाई केली आहे. त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. बांगलादेशातुन अवैध्यरित्या कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय तसेच भारत-बांगलादेश सिमेवरील मुलकी अधिकार्याच्या लेखी परवानगीशिवाय ५ मुली व २ पुरूष यांनी भारतात अनाधिकृत प्रवेश करून पुण्यात बुधवार पेठेतील कुंटणखान्यात वास्तव्य केले असल्याची माहिती तसेच त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व शाबित करणारे कोणतेही कागदपत्र नसल्याचे आणि ते बांगलादेशी आहेत अशी माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. प्राप्त माहितीची खातरजमा करण्यात आली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने बुधवार पेठेत छापा टाकला. तेथे ५ बांगलादेशी महिला आणि २ पुरूष आढळून आले. त्यांना पोलसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याविरूध्द फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील कारवाई पोलिस आयुक्त रितेश कुमार सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे
पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे,
सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश माळेगावे, सपोनि अश्विनी पाटील, सपोनि.पोलीस अंमलदार, राजेंद्र कुमावत, बाबासो कर्पे, अजय राणे, तुषार भिवरकर, मनिषा पुकाळे, अमेय रसाळ, सागर केकाण, हणमंत कांबळे, इरफान पठाण, इम्रान नदाफ, रेश्मा कंक, अमित जमदाडे, संदीप कोळगे, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार यांनी केलेली आहे.