पुणे,दि.१५ :- उत्तमनगर परिसरात अपहरण करून खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या वृध्द महिला व तिची सहकारी चे खंडणी विरोधी पथक -२ ने सुटका
१) बाबुलाल लक्ष्मण मोहोळ वय 45,वर्षे सरडे बाग उत्तमनगर पुणे
२) अमर नंदकुमार मोहिते वय 39 वर्षे गणेश नगर पुणे
३) प्रदीप प्रभाकर नलवडे,38 ,भूगाव ,पुणे
४)अक्षय मारूती फड,24 रा. वारजे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वैभव भास्कर पोखरे यांची आई मीनाक्षी पोखरे व मनीषा पवार यांना कुख्यात गुंड बाबुलाल मोहोळ व त्याचे साथीदारांनीं महिला नामे मीनाक्षी पोखरे व मनीषा पवार यांनी पुणे स्टेशन येथिल स्टॅाल मिळवून दिले नाहित म्हणून ६ लाखाचा तोटा झाला असे सांगून अपहरण करून डांबून ठेवून त्यांना मारहाण करत असून आरोपींनीं वैभव भास्कर पोखरे यांच्या आई ला जीवे मारण्याची धमकी देऊन १७ लाख रुपये ची खंडणी ची मागणी केली होती,
याबाबत पोलिसांना तक्रार केली. त्यानंतर पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेचे.खंडणी विरोधी पथक युनिट दोनच्या पथकातील
शंकर संपते यांना गुप्त बतमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार खंडणी विरोधी पथक कडील अधिकारी व अमलदारांनी माहितीचे विश्लेषण करून उत्तमनगर येथून नमूद महिलांनां डांबून ठेवलेले ठिकाणचा शोध घेऊन सुटका करून
चौघांना अटक केली. ही कामगिरी पुणे शहर पोलिस आयुक्त रितेश कुमार सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे,सहा पोलीस आयुक्त गुन्हे .सतीश गोवेकर, यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक २ गुन्हे शाखा चे पोनि प्रताप मानकर, पोउपनि श्रीकांत चव्हाण,सहा फौ विजय गुरव, पोलीस अमंलदार प्रदिप शितोळ , विनोद साळुंखे , सुरेंद्र जगदाळे , राहुल उत्तरकर, शंकर संपते , संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, सचिन अहिवळे, चेतन आपटे, पवन भोसले, चेतन शिरोळकर, महिला पोलीस अंमलदार आशा कोळेकर यांनी केली आहे.