पुणे,दि.१६ :- पुणे शहरातील उप आयुक्त परिमंडळ ४, च्या हद्दीतील खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणि संघटित गुन्हे करणार्या परिमंडळ चारमधील तब्बल १०४ गुन्हेगारांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्यात आली.
तर, ५० गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले असून १५ गुन्हेगारांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी आज दि.१६ रोजी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ चारमध्ये येरवडा, खडकी, विश्रांतवाडी, विमानतळ, चतुःश्रुंगी, चंदननगर आणि लोणीकंद पोलीस ठाण्यांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी सूत्रे हाती घेतल्यापासून शहरातील सराईत गुन्हेगार, टोळ्या आणि नवोदीत भाईंवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. आजवर एकूण ६० पेक्षा अधिक गुन्हेगारान वर मोक्का कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये परिमंडळ ४ मधील १५ गुन्हेगारान वर समावेश आहे. परिमंडळ ४ मधील पोलीस ठाण्यांच्या रेकॉर्डवरील आणि सातत्याने गुन्हेगारी कृत्ये करणार्या गुन्हेगारान वर पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली मोक्का, तडीपारी आणि स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येत आहे. त्यानूसार १२ टोळ्यांधील १०४ गुन्हेगारांवर मोक्का लावून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले आहे. तर, ५० जणांना तडीपार करण्यात आले असून १५ जणांवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. चारमधील चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यांतर्गत २८, खडकी ४१,
विश्रांतवाडी ६, येरवडा २०, विमानतळ ६ आणि लोणीकंद पोलीस ठाण्यातील ३ अशा एकूण १०४ जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. तर, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १८ व चतुःश्रुंगी पोलिसांच्या हद्दीतून १० आणि इतर पोलीस ठाणे असे मिळून ५० जणांना पुणे शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना, या भागात शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली आहे.
परिमंडळ चार अंतर्गत येणार्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सातत्याने गुन्हेगारी कृत्ये करणार्यांवर मोक्का, तडीपारी आणि स्थानबद्धतेची कारवाई करण्यात येत आहे. त्यानूसार यंदा चालु वर्षात १०४ जणांवर मोक्का तर पन्नास जणांना तडीपार करण्यात आले आहे.
– शशिकांत बोराटे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ चार
…जबरी चोरीच्या घटना सर्वाधिक
परिमंडळ चारमध्ये प्रतिबंधात्मक कारवाया सुरू असल्या व जबरी चोरीच्या घटना सर्वाधिक घडलेल्या आहेत. जानेवारी ते ऑगस्टअखेर म्हणजेच मागील ८ महिन्यात पुणे शहर पोलीस आयुक्तालयात जबरी चोरीचे २५३ गुन्हे दाखल आहेत. यात सर्वाधिक ७७ गुन्हे हे परिमंडळ ४ मध्ये दाखल झाले