पुणे दि,१ :- लोकसभा निवडणुकीत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी वर निवडणूक आयोगाकडून सीव्हीजीएल अॅप तयार
निवडणुकीतील गैरप्रकारांवर राहणार नागरिकांचा वॉच
राज्यात पहिल्यांदाच होणार अॅपचा वापर निवडणुकीत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने “सीव्हीजीएल’ हे मोबाइप अॅप विकसित केले आहे. या अॅपद्वारे नागरिकांना निवडणुकीतील अपप्रवृत्तीची माहिती प्रशासनाला देणे सुलभ होणार आहे. दरम्यान, गैरप्रकाराची माहिती देणाऱ्या नागरिकाची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना तक्रार देणे सोपे होणार आहे. राज्यात पहिल्यांदाच निवडणुकीमध्ये या अॅपचा वापर होणार आहे.
लोकसभा निवडणूक अधिकाधिक पारदर्शकपणे व्हावी. तसेच निवडणुकीत कोणते अनधिकृत प्रकार होऊ नये. लोकसभा निवडणुकीत 100 टक्के आचारसंहितेचे पालन सर्व उमेदवारांनी करावे, यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे. निवडणुकीतील गैरप्रकाराची माहिती आयोगाला समजावी, या हेतूने निवडणूक आयोग आता नागरिकांची मदत घेणार आहे.
आचारसंहितेच्या उल्लंघनाबद्दलची माहिती देण्यासाठी या अॅपद्वारे फोटो अथवा दोन मिनिटांपर्यंतचा व्हिडीओ काढून तो अपलोड करावा लागणार आहे. यासाठी मोबाइलमध्ये इंटरनेट सेवा आणि जीपीएस लोकेक्शन ही सुविधा असणे आवश्यक आहे. फोटो अपलोड झाल्यावर त्या स्थानाचे लोकेशन संबंधित मतदारसंघातील भरारी पथकाला समजाणार आहे. फोटो अपलोड केल्यावर वापरकर्त्याला एक युनिक आयडी मिळणार आहे. त्याद्वारे ते मोबाइलवर तक्रारीचा पाठपुरावा करू शकणार आहे. दरम्यान, तक्रार करणाऱ्या नागरिकांची माहिती अथवा ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे. या मोबाइल अॅपमध्ये आधीपासून अपलोड केलेले फोटो अथवा व्हिडीओ अपलोड करता येणार नाहीत. त्यामुळे अॅपचा गैरवापर होणार नाही.
100 मिनिटांत तक्रारींचे निवारण
मतदारसंघामध्ये तीन भरारी पथके असणार आहेत. या अॅपद्वारे आलेली माहिती या भरारी पथकाला पाच मिनिटांत मिळणार आहे. जर तक्रार योग्य असेल तर 100 मिनिटांत त्या समस्येचे निवारण होणार आहे.
मतदान समाप्त होईपर्यंत करता येणार अॅपचा वापर
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच. या अॅपचा वापर नागरिकांना करता येणार आहे. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते मतदान समाप्त होईपर्यंत हे अॅप नागरिकांना वापरता येणार आहे.आसे आज दि,१ रोजी , विभागीय आयुक्त मा. डॉ. दीपक म्हैसेकर .पत्रकारांना माहिती देण्यात आली आहे