पुणे,दि.०६:- समाज व राज्यकर्ते यांना योग्य दिशा दर्शवण्याचे काम माध्यमे प्रभावीपणे करत आहेत.यापुढेही अशाच पध्दतीचे काम माध्यमांनी करावे असे,प्रतिपादन पुणे शहराचे पोलिस सहआयुक्त संदिप कर्णिक यांनी शक्ती झुंजारच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त औंध येथील पंडित भीमसेन जोशी कलादालनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सांज दैनिक शक्ति झुंजार चे १९९९ पासून सुरू झालेल्या शून्यातून प्रवास व झुंजार डिजिटल पेपर चे निर्भिड अन्यायाविरुद्ध व निपक्ष लिखाणावर संपादक व पत्रकार व संपूर्ण टीमचे केले कौतुक
व्यासपीठावर पुणे शहर पोलिस सहआयुक्त संदिप कर्णिक, चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे, संताजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश भोज, तेली समाजाचे माजी अध्यक्ष संजय भगत, संताजी सेवा मंडळ औंध
अध्यक्ष किशोर कर्पे, कोथरूड संताजी प्रतिष्ठान खजिनदार मधुकर गुलवाडे, प्रांतीक तेली महासभा पुणे शहर माजी अध्यक्ष राजेश शेजवळ, नितीन खोड,सांज दैनिक शक्ती झुंजारचे संपादक संतोष काळे यादी मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दैनिक सांज शक्ती झुंजारच्या कलर अंकांचे तसेच वधुवर परिचय माहिती पुस्तिकाचे प्रकाशन करण्यात आले.
संदिप कर्णिक म्हणाले;’ लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिले जाते. अन्याय विरुद्ध आवाज उठवत समस्यांचे निराकरण करणे समस्याला वाचा फोडणे हे प्रसार माध्यमांचा काम आहे समाजातील आपली विश्वासहार्ता निर्माण करत सातत्याने चांगली आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पत्रकारिता माध्यमातून पञकारांनी काम करणे गरजेचे आहे अशी भावना कर्णिक यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण जाधव यांनी केले तर नितीन खोंड यांनी आभार मानले.