पुणे,दि.१०:- पुण्यातील बुधवार पेठ येथे बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असलेल्या ७ बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली आहे. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथाकाने सोमवारी दि.९ बुधवार पेठेत छापा टाकून बांगलादेशींना अटक केली. व फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील बुधवार पेठे येत काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत असल्याची गोपनीय माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील अधिकारी यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने छापा टाकून ७ बांगलादेशी महिलांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या महिला पुण्यात बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याचे तपासात समोर आले आहे
आरोपी महिलांनी कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारत-बांगलादेश सीमेवरील मुलकी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय गस्ती पथकाची नजर चुकवून रात्रीच्यावेळी भारतात घुसखोरी केली. भारतात आल्यानंतर या महिला पुण्यातील बुधवार पेठेत अनिधिकृतपणे वास्तव्य करत होत्या. पोलिसांना त्यांच्याकडे भारतात राहण्यासंबंधीचे कोणतेही कागदपत्रे आढळून आली नाहीत. बंगलादेशी महिलांविरोधात सामाजिक सुरक्षा विभागाने फिर्याद दिली असून पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फरासखाना पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार,
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक , अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत जाधव, सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे,
सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळगावे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत,
सागर केकाण, बाबा कर्पे, तुषार भीवरकर, अजय राणे, इरफान पठाण, अमेय रसाळ, हनुमंत कांबळे,
अमित जमदाडे, किशोर भुजबळ, ओंकार कुंभार, महिला पोलीस अंमलदार रेश्मा कंक यांच्या पथकाने केली.