पुणे,दि.१३ :- पुण्यातील ससून रूग्णालयात उपचार घेणारा अंमली पदार्थ तस्कर ललित अनिल पाटील याने फरार झाल्यानंतर गुन्हे पुणे शाखेच्या पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण अनिल पाटील व त्याचा साथीदार अभिषेक विलास बलवकडे याला नेपाळ बॉर्डरवरून अटक केली. त्यांना पुण्यात आणण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. दरम्यान, पोलिसांनी बलकवडेच्या नाशिक येथील घराची झडती केली असता त्यामध्ये तब्बल 3 किलो सोनं आढळून आलं आहे. पोलिसांनी ते जप्त केलं असल्याची माहिती पोलिस अधिकार्याने दिली आहे.
महाराष्ट्रातून फरार होण्यासाठी घरामध्ये लपवुन ठेवलेल्या सोन्याचा वापर केला जाणार होता असं देखील पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. दरम्यान, अभिषेक बलकवडेने हे सोने ल ड्रग्सची तस्करी करूनच पैसे कमविल्याचे देखील निष्पन्न झाले आहे.