पुणे,दि.१४ :- आज सकाळी पुण्यातील नवले पुलाच्या जवळ नवले चौकामध्ये कात्रज वरुन येणाऱ्या ट्रकचा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ट्रकने सिग्नलला थांबलेल्या वाहनांना धडक दिली आहे. अचानक लागलेल्या सिग्नलमुळे ट्रकचा अपघात झाला नवले पुलाजवळी अपघात हे नेहमी चर्चेचा विषय ठरत आहेत. अनेकदा या पुलावर आणि पुलाजवळ अपघात होत आसलेल दिसुन येते आहे आज (दि.14) सकाळी मालवाहू ट्रकचा अपघात झाला. या अपघातामध्ये सिमेंटने भरलेला ट्रक उलटला. ट्रकखाली एक दुचाकीस्वार अडकला होता पण सुदैवाने अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र यामध्ये एक दुचाकी व चारचाकीचे नुकसान झाले आहे. चौकामध्येच सिमेंटने भरलेला ट्रक पलटी झाल्यामुळे काही काळ ट्राफिक जाम झाले होते.