पुणे,दि.१५ :- चतुःश्रृंगी मंदिर नवरात्र उत्सव रविवारी (दि.15) सकाळी साडेनऊ वाजता पारंपरिक पद्धतीने घटस्थापना होणार आहे. मंदिराचे विश्वस्त व्यवस्थापक डॉ. गंगाधर अनगळ हे यंदाच्या नवरात्रौत्सवाचे सालकरी असून, त्यांच्या हस्ते अभिषेक, रुद्राभिषेक, महापूजा, महावस्त्र अर्पण करून घटस्थापना होईल. यंदाच्या
नवरात्रौत्सवासाठी देवीला नवी चांदीची आयुधे करण्यात आली आहेत. सकाळी घटस्थापना झाल्यावर ही आयुधे देवीला परिधान करण्यात येणार आहेत. विजयादशमीपर्यंत रोज सकाळी दहा वाजता आणि रात्री नऊ वाजता आरती होणार आहे. तर, गणपती मंदिरामध्ये रोज भजन, कीर्तन, प्रवचन, सामूहिक श्रीसुक्त पठण, वेदपठण असे धार्मिक कार्यक्रम होतील