पुणे,दि.२८:- पुण्यातील चतुःश्रृंगी परिसरात इंटरनेट पुरवठा केबलचे काम करायचे असेल तर दरमहा दहा हजार रुपये द्यावी लागेल, अशी धमकी देवून, इंटरनेट व्यावसायिकाकडे दरमहा दहा हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या तिघांना खंडणी विरोधी पथक-२,पुणे शहर गुन्हे शाखेने अटक केली.चतुःश्रृंगी परिसरातील दीपबंगला चौक परिसरात खंडणी मागणाऱ्याना अटक करण्यात आली. याप्रकरणी निखिल शिवा कांबळे (वय १९), अतुल अनिल धोत्रे (वय २१), तेजस शिवाजी विटकर (वय २१, तिघे रा. वडारवाडी, ) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
खंडणी विरोधी पथकाकडे याबाबतची तक्रार एका इंटरनेट व्यावसायिकाने दिली होती. व्यावसायिकाच्या कामगारांकडून पांडवनगर भागात इंटरनेट केबल टाकण्याचे काम करण्यात येत होते. आरोपी कांबळे, धोत्रे, विटकर यांनी या कामगारांना धमकावले. तसेच काम न करण्यास धमकावले. त्यानंतर व्यावसायिकाने आरोपींकडे विचारणा केली असता, या भागात काम करायचे असल्यास दरमहा दहा हजारांची द्यावी लागेल, असे सांगितले.
दि.२३/१०/२०२३ रोजी तक्रारी अर्ज दिला होता. सदर तक्रारीची खात्री करुन कारवाई करणेबाबत पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा पुणे शहर यांना आदेशीत केले होते.
नमुद तक्रारीची खंडणी विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहरचे प्रभारी अधिकारी यांनी तात्काळ दखल घेतली. दि. २५/१०/२०२३ रोजी निखील कांबळे याने तक्रारदार यांना पैसे घेवून हॉटेल रेड पान्डा चायनिज, दिप बंगला चौक, शिवाजीनगर, पुणे येथे बोलविल्याने पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर यांनी पथक तयार करुन सापळा कारवाई करुन आरोपी नामे १) निखील शिवा कांबळे, वय-१९ वर्ष, रा. मरगम्मा देवी मंदिरा समोर, पांडवनगर, पुणे २) अतुल अनिल धोत्रे, वय-२१ वडारवाडी, कुसाळकर बिल्डिंग, पुणे ३) तेजस शिवाजी विटकर, वय-२१ वर्ष, रा. ब्लॉक वर्ष, रा. जुनी नं.३०, भाभा हॉस्पिटलचे मागे, वडारवाडी, पुणे यांना घटनास्थळी तडजोडीअंती तक्रारदार यांचेकडुन ४,०००/- रुपये खंडणीची रक्कम स्विकारले असताना त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेविरुध्द तक्रारदार यांनी दिले फिर्यादीवरुन चतुःश्रृंगी पो.स्टे. गुन्हा दाखल करण्यात आला असुन दाखल गुन्हा त्यांना अटक करण्यात आली आहे.
सदरची कामगिरी ही. पोलीस आयुक्त, पुणे शहर. रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त, संदिप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे), रामनाथ पोकळे,पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), अमोल झेंडे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे-२, सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शानाखाली खंडणी विरोधी पथक – २, गुन्हे शाखा, पोलीस निरीक्षक, प्रताप मानकर, पोलीस उप-निरीक्षक, श्रीकांत चव्हाण, मोहनदास जाधव व पोलीस अंमलदार, विजय गुरव, प्रदिप शितोळे, सचिन अहिवळे, सुरेंद्र जगदाळे, संग्राम शिनगारे, ईश्वर आंधळे, राहुल उत्तरकर, सैदोबा भोजराव, शंकर संपते, चेतन आपटे, चेतन शिरोळकर, किशोर बर्गे, आशा कोळेकर यांनी केलेली आहे.