पुणे दि,०५ : – महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी भाजप-शिवसेना युतीचे सुनिल कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी आज दि.५ रोजी निवडणूक घेण्यात आली. होती या पदासाठी भाजपने ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे यांना उमेदवारी दिली होती.
स्थायीतील संख्याबळ लक्षात घेता, अध्यक्षपदी सुनिल कांबळे यांच्या निवड निश्चित असल्याचे वर्तविले जात होते. आज त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा आज दुपारी करण्यात आली. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसनेही उमेदवार . होता. अखेर स्थायीच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीच्या उमेदवार स्मिता कोंढरे यांनी माघार घेतल्याने सुनील कांबळे यांची बिनविरोध निवड झाली.
महापालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सकाळी ११ वाजता निवडणूक पार पडली. भाजप-शिवसेना युतीतर्फे कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली होती. स्थायी समितीत भाजपचे दहा, राष्ट्रवादीचे चार आणि कॉंग्रेस, शिवसेनेचा प्रत्येक एक सदस्य होते