पुणे,दि.०३:- पुणे शहरातील कोंढवा परिसरात दोन गावठी पिस्टल बाळगणारा तरुणाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५५ हजार ४०० रुपयांचे दोन पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही कारवाई कोंढवा परिसरात असलेल्या श्रीराम चौक ते इस्कॉन मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर केली. तुळशीराम शहाजी उगडे (वय-25 रा. टिळेकरनगर, पुणे, मुळ रा. लांडवाडी, ता. कर्जत जि. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोंढवा पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना. त्यावेळी पोलीस अंमलदार विशाल मेमाणे यांना गोपनीय माहिती मिळाली की, खडी मशीन पोलीस चौकी जवळील श्रीराम चौक ते इस्कॉन मंदिराकडे जाणाऱ्या रोडवर एक तरुण संशयित रित्या थांबला आहे. त्याच्या कडे पिस्तुलासारखे हत्यार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तपास पथकाने घटनास्थळी जाऊन सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला पोलीस पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी एक पिस्टल व एक गावठी कट्टा कमरेला दिसला. तसेच जिन्स पॅन्टच्या खिशात प्लॅस्टिकच्या पिशीत दोन जिवंत काडतुसे, पिस्टलच्या मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे मिळाली. पोलिसांनी आरोपीकडून दोन पिस्टल व चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. आरोपीवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेश पाटील करीत आहेत.
कारवाई ही पोलीस आयुक्त रितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त. रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त., पुर्व प्रादेशिक विभाग, विक्रांत देशमुख, पोलीस उप-आयुक्त. परिमंडळ-५, शाहूराजे साळवे, सहा. पोलीस आयुक्त. वानवडी विभाग संतोष सोनवणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस स्टेशन, संदीप भोसले, पोलीस निरीक्षक., गुन्हे संजय मोगले, पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहा पोलीस निरीक्षक दिनेश पाटील, सहा पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे, पोलीस हवालदार विशाल मेमाणे, पोलीस हवालदार सतिश चव्हाण, पोलीस हवालदार निलेश देसाई, पोलीस हवालदार लवेश शिंदे, पोलीस नाईक जोतिबा पवार, पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर, पोलीस अंमलदार संतोष बनसुडे, पोलीस अंमलदार सुजित मदन, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर भोसले, पोलीस अंमलदार अभिजीत रत्नपारखी, यांच्या पथकाने
केली आहे.