पुणे,दि.०६ :- पुण्यातील घोरपडी पेठ परिसरात मध्यरात्री घरात शिरून एका वर गोळी झाडत खून करून पसार झालेल्या तिघा आरोपींना पुणे शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी १२ तासात बेड्या ठोकल्या. तर, मुख्य आरोपीला खडक पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुर्ववैमन्यासातून ही घटना घडल्याचे तपासात समोर आले आहे. नवनाथ सुरेश लोधा (वय ३२, रा. घोरपडीपेठ), रोहित संपत कोमकर (वय ३३), गणेश उल्हासराव शिंदे (वय ४१), अमन दिपक परदेशी (वय २९) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या घटनेत अनिल साहू (वय ३५) याचा खून झाला आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा नोंद आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार अजय थोरात, अय्याज दड्डीकर, निलेश साबळे, आण्णा माने, व त्यांच्या पथकाने केली आहे. नवनाथ लोधा हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर गंभीर ७ गुन्हे दाखल आहेत.दरम्यान, मयत अनिल साहु व लोधा एकाच इमारतीत रहात होते. दोघांनाही दारूचे व्यसन आहे. दरम्यान, साहू हे दारू पिल्यानंतर शिवीगाळ करत असत. त्यामुळे त्यांची यापुर्वी तीन ते चार वेळा भांडणे झाली होती. दरम्यान, रविवारी रात्रीही त्यांच्यात वाद झाले होते. यावादानंतर अनिल त्यांच्या घरी गेले होते. ते दुसऱ्या मजल्यावर रहात होते. तेव्हा दोन वाजण्याच्या सुमारास नवनाथ हातात बंदूक घेऊन त्यांच्या घरी गेला. त्याने तीन ते चार वेळा टकटक वाजवल्याने अनिलचा भाऊ धुरणकुमार यांनी दार उघडले. आरोपीने तेरा भाई किधर है, असे विचारत त्याला बाहेर बोलवण्यास सांगितले. अनिल दारात आल्यानंतर नवनाथने त्यांच्या कपाळावर बंदूक ठेवत गोळी झाडली. त्यानंतर तो साथीदारांच्या मदतीने पसार झाला होता.
मध्यभागात गोळ्या झाडून खून झाल्याने एकच खळबळ उडाली होती.पुणेशहर गुन्हे शाखा व खडक पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू होता. त्यावेळी गुन्हे शाखेच्या युनिट एकला रोहित, गणेश व अमन यांच्याबाबत माहिती मिळाली. त्यानूसार त्यांना जेरबंद केले. तर, नवनाथ याच्याबाबत खडक पोलिसांना माहिती मिळाली.
मख्य आरोपी नयनाथ ऊर्फ नव्या सुरेश लोधा हा फरार असल्याने त्यास पकडणेकामी सुनिल माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन व संपतराव राऊत, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांनी तपास पथकाचे अधिकारी राकेश जाधव, सहा. पोलीस निरीक्षक व अंमलदार यांना योग्य त्या सुचना देवुन मार्गदर्शन केले. त्याप्रमाणे आरोपी नवनाथ ऊर्फ नख्या सुरेश लोधा याचा शोध चालू असताना पोलीस अंमलदार हर्षल दुडम व पोलीस अंमलदार आशिष चव्हाण यांना नमुद गुन्हयातील बंदुकीतुन गोळी झाडलेला मुख्य आरोपी गुन्हेगार नवनाथ लोधा ऊर्फ नच्या हा आहे व तो खेड शिवापुर येथे असलेल्याचे गोपनीय माहीती मिळाल्यानंतर तपास पथक अधिकारी राकेश जाधव यांना वरिष्ठांना सांगितले असता सुनिल माने, वरिष्ठ पोलीस निरिक्षक व पोलीस निरीक्षक गुन्हे संपत राऊत यांनी आदेश दिल्याने राकेश जाधव, सहायक पोलीस निरिक्षक यांनी पथकासह खाजगी वाहनाने बातमीच्या टिकाणी खेड शिवापुर याठिकाणी जाउन मुख्य आरोपी नवनाथ सुरेश लोधा, याच्या मुसक्या आवळल्या. त्याचेकडे दाखल गुन्हयावायत तपास केला असता त्याने नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपी नवनाथ ऊर्फ नव्या सुरेश लोधा यास गुन्हयामध्ये दिनांक ३०/१०/२०२३ रोजी २१.३० वा. अटक करण्यात आली आहे. गुन्हयाचे तपासादरम्यान त्याचेकडून गुन्हयात पापरलेले १ गावठी पिस्टल जप्त करण्यात आले. तसेच गुन्हयातील त्याचा साथीदार आरोपी नामे गणेश उल्हासराव शिंदे याचेकडून तपासा दरम्यान दोन (२) गावठी पिस्टल व दोन (२) जियंत राउंड जप्त करण्यात आले असुन अधिक तपास चालु आहे.
मुख्य आरोपी नवनाथ उर्फ नच्या सुरेश लोधा याचीयरुध्द यापुवी खडक, मुंढवा व दलवाडी पालीस
ठाणेस दुखापत, घातक शरख जवळ बाळगणे, गैरकायद्याची मंडळी जमवुन खुनाचा प्रयत्न, अग्निशस्त्राचा वापर
करुन खुनाचा प्रयत्न, जाळपोळ, असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई.पुणे शहर पोलीस आयुक्त, रितेश कुमार सह.पोलीस आयुक्त,संदिप कर्णिक, प्रविण पाटील, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे, संदिपसिंह गील, पोलीस
उप आयुक्त परिमंडळ १ पुणे. अशोक धुमाळ, सहा पोलीस आयुक्त फरासखाना विभाग यांचे
मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे सुनिल माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, संपत राउन पोलीस
निरीक्षक (गुन्हे), राकेश जाधव सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस उप-निरीक्षक अजीज बेग, पोलीस
अंमलदार हर्षल दुडम, संदिप तळेकर, सागर घाडगे, लखन ढावरे, आशीष चव्हाण, मंगेश गायकवाड, सागर
कुडले, अक्षयकुमार वाबळे, प्रमोद भोसले, रफिक नदाफ, महिला पोलीस अंमलदार राणी जाधव यांचे पथकाने
केली आहे.